NCP Vs BJP : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजूर ग्रामपंचायत ( ता. अकोले ) सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) गटाच्या पुष्पाताई निगळे यांचा 19 मताने विजय झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांचा राजूर हा बालेकिल्ला समजला जातो.
निगळे यांना 1876 तर देशमुख यांना 1852 इतके मते मिळाली. सरपंचपदाच्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून ग्रामविकासाच्या माध्यमातून काम करू असे निगळे यांनी सांगितले. तर आपला पराभव झाला असून आपण तो स्वीकारला आहे. मात्र मिळालेले मते दुर्लक्षित करण्यासारखे नसल्याचे देशमुख म्हणाल्या.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : वार्ड क्रमांक एक प्रमोद देशमुख (महाविकास आघाडी), अतुल पवार (भाजप), संगीता मैड (भाजप) वार्ड क्र.2 ओंकार नवाळी(महाविकास), संगीता मोहंडुळे (आघाडी), संगीता जाधव (आघाडी) वार्ड क्र.3 रामा मुतडक (आघाडी), रोहिणी देशमुख (भाजप), वार्ड क्र.4 गोकुळ कानकाटे (भाजप),सुप्रिया डगळे (भाजप), सारिका वालझाडे (भाजप), वार्ड क्र.5 राम बांगर (भाजप), कुसुम रावते(आघाडी), रोहिणी माळवे (आघाडी), वार्ड क्र.6 गणपत देशमुख(भाजप), संतोष बनसोडे (भाजप),लता सोनवणे (भाजप)
तालुक्यातील 41 ग्रामपंचायतमध्ये आमदार डॉ. किरण लहामटे,माजी आमदार वैभव पिचड, अशोक भांगरे यांना मानणारे सरपंच निवडणूक जिंकल्याने गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. मतमोजणी दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राजूरसह 45 गावांत सरपंचपदाच्या व्यक्ती जनतेतून निवडण्यात आल्या असून, तालुक्यात बहुतांश गावांत भाजपने बाजी मारली आहे. राजूर ग्रामपंचायतीमध्ये 19 मतांनी भाजपची महिला पराभूत झाली. मात्र, 17 पैकी 11 सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. निवडून आलेल्या पुष्पा निगळे यांनी सरपंचपदासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या राजूर महिला अध्यक्ष जयश्री देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दखल केला. त्यामुळे तिरंगी लढत झाली 4198 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीत चुरस होऊन निगळे यांना 1871, तर शोभा देशमुख यांना 1852 मते मिळाली. जयश्री देशमुख यांना 302, ललिता अशोक धादवड यांना 108, दीपाली वाळकुळे यांना 35, तर ‘नोटा’ला 30 मते मिळाली. त्यात निगळे या 19 मतांनी निवडून आल्या आहेत.
अन्य सरपंच
म्हाळुंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे मदन निवृत्ती मेंगाळ विजयी झाले असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय अस्वले यांचा पराभव केला. खिरविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे गणपत डगळे विजयी झाले आहेत. तसेच मुथाळणे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या सुनंदा अशोक गावंडे विजयी झाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.