साताऱ्यातील दिग्गज नेते हे उदयनराजे आणि आमदार गोरेंना कुरवळणार की दूर लोटणार?

खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते सामावून घेणार का, यावर या निवडणुकीचे बिनविरोधचे चित्र अवलंबून आहे.
satara DCC Bank
satara DCC Banksarkarnama

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या सोमवार (ता. 18)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. प्रत्यक्ष मतदान 21 नोव्हेंबर मतदान होऊन २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यावेळेस पक्षविरहित सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांना सामावून घेतले जाणार का, यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरूध्द भाजपचे पॅनेल असे चित्र पहायला मिळणार अशी आशा होती. पण भाजपचे नेते एकवटले नाहीत. तर राष्ट्रवादीने सर्वाधिक मते असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, निवडणुक पक्षविरहित व सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. त्यासाठीची सर्व रणनिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकार तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून ठरविली जात आहे.

satara DCC Bank
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

त्यामुळे कोणाला पॅनेलमध्ये घ्यायचे व कोणाला नाही, हे तेच ठरविणार आहेत. सोमवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते सामावून घेणार का, यावर या निवडणुकीचे बिनविरोधचे चित्र अवलंबून आहे.

satara DCC Bank
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

यामध्ये सोसायटी मतदारसंघात चुरस असून जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी चार ऑक्टोबरला जाहीर झाली होती. परंतु कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम लांबला होता. अखेर शनिवारी तो जाहीर झाला. सोमवारपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. 18 ते 25 अर्ज दाखल करणे. 26 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी, आणि 27 रोजी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

satara DCC Bank
जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादीची खेळी; उदयनराजेंचा निर्णय सोपविला शिवेंद्रसिंहराजेंवर

27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल. 11 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com