Satara News : वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर; घेतला हा निर्णय...

Satara collector जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सायंकाळी मुख्य बसस्थानक परिसराची पायी फिरुन पहाणी केली.
Jitendra Dudi, Samir Shaikh, Rohan Palange
Jitendra Dudi, Samir Shaikh, Rohan PalangePramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara News : सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेचे उडालेले तीन तेरा पाहून आज खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे रस्त्यावर उतरले. त्यांनी आज सायंकाळी मुख्य बसस्थानक परिसराची पायी फिरुन पहाणी केली. त्यानंतर मुख्य बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या बसेस स्थानकांच्या मागील बाजूने नेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासाठी नवीन गेट काढण्याची सूचना त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार आहे.

सातारा शहरात Satara city वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याबाबत मध्यंतरी बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीसाठी नवीन आराखडा तयार करुन त्यादृष्टीने या परिसरात एकेरी वाहतूक केली होती. पण, त्यातून बसची एक स्टेज वाढत असल्याने नागरीकांना वाढीव तिकिटाचा भूर्दंड बसत होता. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी Satara Collector यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली गेली.

त्यावेळीच त्यांनी आपण स्वत: याबाबत पोलिस अधिक्षकांसमवेत पहाणी करुन तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, वाहतूक शाखेचा अभिजित यादव, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, तहसिलदार राजेश जाधव आदी उपस्थित होते.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी या सर्वांनी बसस्थानक परिसरातील वाहतूकीची पहाणी केली. त्यानंतर बसस्थानकांत जाऊन आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी बसेसना पश्चिमेकडूनच दोन गेट असल्याने या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बसस्थानकांच्या मागील बाजूला असलेल्या लोणंद रस्त्याला आणखी एक गेट काढण्याची सूचना करुन या गेटमधूनच एसटी बसेस बाहेर जातील, अशी सूचना केली. त्यामुळे बसस्थानक परिसरातील रस्त्यावर बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी संपणार आहे.

Edited By Umesh Bambare

Jitendra Dudi, Samir Shaikh, Rohan Palange
Satara Politics News : माजी मुख्यमंत्र्यांमुळे शेतकऱ्यांनी 17 वर्षांनी सोडला सुटकेचा नि:श्वास! नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com