Congress Meeting: पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून रिंगणात...; काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारी...

Satara Lok Sabha Constituency: पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
Satara Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Satara: पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीत सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश जी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, आमदार व सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

Satara Lok Sabha Constituency
Nagar Politics: थोरातांना विखेंनी पुन्हा सुनावले; 'नथीचे कौतुक करून घेणाऱ्यांनी...'

यावेळी सातारा, कराड, फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला मिळावी. सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात यावी अशी, जोरदार मागणी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सदस्य सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, फलटण तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमिर भाई शेख तालुका उपाध्यक्ष व सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पंकज पवार, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण फलटण तालुका सेवा दलाचे फलटण तालुका अध्यक्ष दादासाहेब घोरपडे, फलटण तालुका ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दीपक शिंदे,सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे, सातारा, कोरेगाव, कराड, फलटण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com