आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

मंत्रीमंडळाच्या Cabinet Meeting बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री DyCM अजितदादा पवार Ajit dada Pawar यांनी सामाजिक न्याय विभागाच्या Department of Social Justice सर्व महामंडळांना corporations भरघोस निधी Lots of funds देण्याचे जाहीर केले आहे.
Mahesh Tapase, Jaykumar Gore
Mahesh Tapase, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रकार माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. त्यांना तत्काळ अटक करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (२ मे) सातारच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे.

भाजपचे सातारचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल आहे. त्यांना तात्काळ अटक व्हावी व एकंदरीत मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी साताराच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती महेश तपासे यांनी दिली. भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या या कृत्यामुळे एकंदरीतच भाजपाचा मनुवादी चेहरा जनतेसमोर आलेला आहे.

Mahesh Tapase, Jaykumar Gore
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

''भाजपशासित राज्यांमध्ये दलित आदिवासी व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत चालले आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही पण तशाप्रकारचा अत्याचार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही कदापी होऊ देणार नाही,'' असा निर्धार महेश तपासे यांनी व्यक्त केला. नुकताच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महामंडळांना भरघोस निधी देण्याचे जाहीर केले आहे.

Mahesh Tapase, Jaykumar Gore
भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

त्यामुळे आम्ही मागासवर्गीयांवर कुठल्याच प्रकारचा अत्याचार होऊ देणार नाही असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी एसपींच्या भेटीवेळी सातारा जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मागासवर्गीय समाजातील काही स्थानिक नेतेही उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com