राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी शिवसनेचे ३ अन् काँग्रेसचे २ मंत्री लागले कामाला

Shivsena | Congress |NCP : महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची ताकद कमी करण्यावर भर?
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisarkarnama
Published on
Updated on

(Satara ZP Election)

सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला (NCP) पक्षाचे एकहाती वर्चस्व असलेला सातारा जिल्हा परिषदेचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी बरीच कसरत करावी लागण्याची चिन्ह आहेत. कारण वाढलेल्या सदस्य संख्येमुळे आधीच संख्याबळ वाढविण्याचे आव्हान असाताना राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी महाविकास आघाडीमधील इतर पक्षांनीही रणनिती आखली आहे. यासाठी शिवसनेचे ३ अन् काँग्रेसचे २ मंत्री कामाला लागले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाची युती अन् कोणाची आघाडी होणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र साताऱ्यात काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) मागील काही निवडणुकीतील परिणामांमुळे राष्ट्रवादीवर नाराजी आहे. मागील काही निवडणुकांत आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेला राष्ट्रवादीने सामावून घेतलेले नव्हते. काँग्रेसबाबतही फारसे काही वेगळे चित्र नव्हते. परिणामी युती, आघाडीच्या निर्णयाची वाट न बघता प्रत्येक पक्षाने स्वबळाची तयारी ठेवून सुरुवात केली असून आतापासूनच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सातारा जिल्ह्यात लक्ष घातले आहे.

Mahavikas Aghadi
किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो

सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असून त्यांचे ४० सदस्य होते. आता त्यांनी ७३ जागा डोळ्यासमोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. सध्या गट, गणांच्या झालेल्या पुर्नरचनेत जिल्हा परिषदेचे ७३ गट व १४६ गण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक गट हे कराड व सातारा तालुक्यात आहेत. तसेच फलटण, खटाव कराड तालुक्यात प्रत्येकी २ गट वाढले असून कोरेगाव, वाई, पाटणमध्ये प्रत्येकी १ गट वाढलेला आहे. या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी चे प्राबल्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इथून सर्व सदस्य निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सदस्य प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या ४० जागांवरुन ७३ पर्यंत सदस्य नेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

दुसरीकडे हा बालेकिल्ला भेदण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे, पाटणचे नेते, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशिवाय शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क मंत्री व क्रिडा मंत्री उदय सामंत यांच जिल्ह्यात लक्ष आहे. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही जिल्ह्यात लक्ष घातलेले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती, तीन मंत्री, एक आमदार व स्थानिक नेते या निवडणुकांची रणनिती ठरविणार आहेत.

Mahavikas Aghadi
केतकी चितळेही सदावर्तेंच्या वाटेवर : साताऱ्यात बारावा गुन्हा दाखल

भाजपने मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत पाय रोवले आहेत. आता त्यांना त्यांची सदस्य संख्या कशी वाढेल, यावर भर दिला आहे. भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार व दोन आमदार आहेत. त्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीपुढे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. पण सध्या त्यांचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे हे अडचणीत असून ते या निवडणुकांपर्यंत सक्रिय होणे गरजेचे आहे. तरच राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण होऊ शकणार आहे. सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही लक्ष घालणार आहेत.

काँग्रेसची गेल्या निवडणुकीत मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे त्यांना शक्य झाले तर राष्ट्रवादी सोबत आघाडी करणे अन्यथा स्वबळावर लढणे हाच पर्याय आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीने काँग्रेसला सर्व ठिकाणी डावलले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काय भूमिका घेणार यावर सर्व अवलंबून आहे. काँग्रेसकडून कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हासंपर्क मंत्री सतेज पाटील, सांगलीचे राज्यमंत्री विश्वजित कदम हेही सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला ताकद देणार आहेत. त्यामुळे त्यांची रणनिती काय ठरणार हेही महत्वाचे आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षांची ताकद

  • राष्ट्रवादी ४१

  • भाजप ६

  • शिवसेना २

  • काँग्रेस ७

  • साविआ ३

  • पाविआ १

  • कविआ ३

  • अपक्ष - १

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com