Satara Lok Sabha News: रामराजे- उदयनराजेंच्या भेटीने खळबळ, प्रभाकर घार्गेंच्या दालनात खलबतं

Satara Lok Sabha Constituency 2024: रामराजे व उदयनराजेंचे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सूर जुळलेले आहेत. त्यामुळे या भेटीमुळे निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील रामराजेंचा गट हा उदयनराजेंसोबतच राहणार हे निश्चित झाले आहे.
Satara Lok Sabha Constituency 2024
Satara Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News: महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व फलटणचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)यांची आज साताऱ्यातील प्रीती हॉटेलवर भेट झाली. या वेळी दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात (Satara Lok Sabha Constituency 2024) बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामराजेंचा सातारा लोकसभेचा गट उदयनराजेंसोबतच राहणार हे निश्चित मानले जात आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. या लढतीतून दोघांपैकी एकाची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार आहे. अशा परिस्थितीत दोघांनीही पायला भिंगरी लावून प्रचार सुरू केला आहे. दोघांनीही प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या ही दोघेही गाठीभेटी घेत असल्याने जनतेत मात्र, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले यांची हॉटेल प्रीती येथे विधान परिषदेचे माजी सभापती व अजित पवार यांच्या गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत भेट झाली. या वेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनील काटकर, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे उपस्थित होते. आज दुपारी या दोघांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या दालनात सुमारे अर्धातास चर्चा केली. या वेळी बंद दाराआड झालेल्या चर्चेवेळी प्रभाकर घार्गे व मनोज घोरपडे हे दोघेच उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी सातारा लोकसभेबाबत चर्चा केली.

Satara Lok Sabha Constituency 2024
Ajit Pawar News: सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या! 'चाळीस वर्षे झाली तरी घरची लक्ष्मी बाहेरची?

रामराजे व उदयनराजेंचे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सूर जुळलेले आहेत. त्यामुळे या भेटीमुळे या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील रामराजेंचा गट हा उदयनराजेंसोबतच राहणार हे निश्चित झाले आहे. या वेळी दोघांनीही एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. रामराजेंनी उदयनराजेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक बोलणं टाळलं. त्यामुळे सध्या सातारा लोकसभेच्या मैदानात सुरू असलेल्या हायहोल्टेज ड्रामामध्ये उदयनराजे, रामराजेंची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com