Satara News: सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha) उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अद्याप भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही.आपल्या नावावर भाजप लवकरच शिक्कामोर्तब करेल, अशी आशा त्यांना आहे.
दिल्ली, मुंबई येथे पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्यानंतरही त्यांना उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम आहे. पण उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर आज अनामत रक्कम भरली आहे. येत्या 18 एप्रिलला उदयनराजे भोसले हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या भाजपकडून याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये उदयनराजे यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उदयनराजे यांच्या समर्थकांच्या नाराजीची दखल पक्षाने घेतलेली नाही, त्यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला तर ते अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
अजित पवार गटाकडून उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा निरोप धनंजय मुंडे यांनी तसा निरोप दिला. मात्र, उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अजित पवार जागा सोडायला तयार नाहीत आणि उदयनराजे ठाम असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. उदयनराजे कमळ चिन्हावर लढण्यावर ठाम असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे," असा ठाम विश्वास उदयनराजेंना आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली असताना साताऱ्याच्या उदयनराजेंची उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर उपस्थित होते. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगांव (ता.जावळी) येथील हुमजाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.