Satara Lok Sabha Election 2024 : 'कितीही गुन्हे दाखल करा शरद पवारांची साथ सोडणार नाही'; शशिकांत शिंदेंनी ठणकावलं!

Shashikant Shinde News : पवारांचे उमेदवार शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या घटनेवर वातावरण चांगेलच तापले आहे.
Satara Lok Sabha Election 2024
Satara Lok Sabha Election 2024Sarkarnama

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. भाजपकडून दिग्गज उमेदवार उदयनराजे भोसले मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे लढाईत उतरले आहेत. साताऱ्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडून येत आहेत. पवारांचे उमेदवार शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या घटनेवर वातावरण चांगेलच तापले आहे. यावर आता शिंदे यांनी 'कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ कधीच सोडणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. (Lok sabha Election 2024)

शशिकांत शिंदे प्रचारसभेत म्हणाले, "काल रात्री मला एक नोटीस आली. या नोटिशीतून कळलं की माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला, अर्थात निवडणुकीत असे गोष्टी होत असतात, पण शरद पवार साहेबांची शप्पथ घेऊन सांगतो. अजून एक केस करा, दोन केस करा, असे कितीही केसेस माझ्या अंगावर टाका, मरेपर्यंत शरद पवार यांची साथ सोडणार नाही म्हणजे नाही. उद्या जे काय व्हायचं ते होऊ देत. पण निवडणुक असे लढा की सर्वजण लक्षात ठेवतील," अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"साताऱ्यात मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीचं वातावरण चांगल झालं आहे. निवडणुकीत राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेविरोधात असलेला रोष दिसून येत आहे. आम्ही गादीचा मान ठेवला, तीन वेळा त्यांना खासदार केला. मात्र इतकं असूनही छत्रपतीच्या स्मारकाच काय झालं?" असाही सवाल त्यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना विचारला.

Satara Lok Sabha Election 2024
Shivsena Vs BJP: "मंगळसूत्रास हात घातला मोदींनी अन् कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर," ठाकरे गटाचा हल्लाबोल
Satara Lok Sabha Election 2024
Sharad Pawar Sabha : कोल्हेंसाठी शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली !

शरद पवारांचा इशारा -

मुंबई बाजार समितीबाबत (Mumbai Bajar Samiti) काही तक्रारी झाल्यावरून सातारा लोकसभेचे उमेदवार (Satara Loksabha Constituency) आमदार शशिकांत शिंदेंवर गुन्हा नोंदवून त्यांना निवडणुकीतून अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील, असा इशारा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com