Pune News : शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता सुरुवातीला भेटीसाठी आणि त्यानंतर कोपरा सभांच्या माध्यमातून चाललेला प्रचार आता दिग्गज नेत्यांच्या विराट सभांपर्यंत येऊन पोहोचला आहे. यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते मैदानात उतरले असून, शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मॅरेथॉन सभा घेणार आहे
शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांनीय ही सभा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. सध्या शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावरती असून, राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. यानंतर ते पुढच्या टप्प्यामध्ये बारामती शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचारात सक्रिय होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे वेळापत्रकही ठरले आहे. शिरूर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरूर, खेड -आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत. शरद पवार यांच्या सोबतच कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.
शिरूर - हवेली विधानसभा
२८ एप्रिल - उरळी कांचन, या. हवेली
जुन्नर विधानसभा
३० एप्रिल - ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
६ मे - कात्रज
भोसरी विधानसभा
७ मे - मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव - शिरूर विधानसभा
८ मे - रांजणगाव, ता. शिरूर
खेड - आळंदी विधानसभा
१० मे - चाकण बाजार समिती आवार
जुन्नर विधानसभा
११ मे - सांगता सभा राजुरी, ता. जुन्नर
(Edited by : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.