Satara Loksabha Constituancy : बारामतीकराकडून साताऱ्यात उमेदवारीचा श्रीगणेशा, उदयनराजे, शिंदे, बिचुकलेंनी नेले अर्ज !

The BJP has not yet announced the candidature of Udayanraje : उदयनराजेंच्या उमेदवारीची अद्यापही भाजपकडून घोषणा झालेली नाही..
Satara Loksabha
Satara LoksabhaSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बारामती येथील उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल करत श्रीगणेशा केला. मतदारसंघातून उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, अभिजित बिचुकलेंसह 30 जणांनी 55 उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. येत्या सोमवारी (ता.15) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे उदयनराजेंच्या उमेदवारीची अद्यापही भाजपकडून घोषणा झालेली नाही.

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरवात झाली आहे. अद्यापपर्यंत या मतदारसंघातून केवळ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून मारुती जानकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. अद्याप महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. तरीही उदयनराजेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satara Loksabha
Mohite Patil News : भाजप सोडलेले मोहिते पाटील म्हणतात, ‘तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे’

सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले,आमदार शशिकांत शिंदे,अभिजित बिचुकले, (Abhijit Bichukale) यांच्यासह 30 इच्छुकांनी 55 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. त्यामुळे यावेळेस या मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी वानेवाडी (ता.बारामती, पुणे) येथील राहूल गजानन चव्हाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साताऱ्यातही बारामतीकरानेच अर्ज भरण्याचा श्री गणेशा केल्याने सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

येत्या सोमवारी (ता.15) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.त्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शन करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिलपर्यंत असून आता भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार याची उत्सुकता आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

Satara Loksabha
Madha Lok Sabha : गुलालात माखलेले धैर्यशील यांचा फोटो ट्विट करत रणजितसिंहांनी फुंकले विजयाचे रणशिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com