Mohite Patil News : भाजप सोडलेले मोहिते पाटील म्हणतात, ‘तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे’

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 April : भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (ता. 13 एप्रिल) दुपारी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे,’ असे म्हणत उद्या (ता. 14 एप्रिल) अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. धैर्यशील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे, त्यानिमित्त होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) तुतारीवर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील भाजपचे चिन्ह आणि मोदी-शाह यांचे फोटो हटवले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil
Madha Lok Sabha : गुलालात माखलेले धैर्यशील यांचा फोटो ट्विट करत रणजितसिंहांनी फुंकले विजयाचे रणशिंग!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 14 एप्रिल) धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत आणखी कोण कोण राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे. कारण, जयसिंह मोहिते पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे ते भाजपसोबत राहणार असल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान, भाजपकडून उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha Constituency) दौरा केला आहे. त्यात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत गेला. खुद्द जयसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही होते, तर धैर्यशील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते, त्यामुळे मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

R

Dhairyasheel Mohite Patil
Prakash Awade News : मोदींचा फोटो लावून प्रकाशअण्णा आवाडेंनी हातकणंगलेत महायुतीविरोधात ठोकला शड्डू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com