Satara Loksabha Election 2024 : सातारचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढवावा; भाजप पदाधिकाऱ्यांचे बावनकुळेंना साकडं

Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारा खासदार सातारा लोकसभेतून निवडून देण्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्ते, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्यांच्या भावना विचारात घेऊन लवकरच सातारा लोकसभेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे वचन त्यांनी दिले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Satara Loksabha News : महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील भाजपच्या कोअर कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्याकडे केली. यावर बावनकुळे यांनी सर्वांनी महायुतीचे काम पूर्ण क्षमतेने करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारा खासदार सातारा लोकसभेतून निवडून देण्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्ते, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्यांच्या भावना विचारात घेऊन लवकरच सातारा लोकसभेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे वचन त्यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाचे BJP प्रदेशाध्यक्ष काल कराड तालुक्यातील बेलवडे येथील कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी साताऱ्यात येऊन येथील हॉटेल लेकव्ह्यू येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत कमिटीच्या सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjisingh naik nimbalkar, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, कोरेगावच्या प्रिया शिंदे, लोकसभा संयोजक सुनील काटकर, वाई विधानसभा निवडणूक प्रमुख सुरभी भोसले, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, माढा लोकसभा Madha Loksabha संयोजक जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
Madha Lok Sabha News : रामराजे-मोहिते पाटील विसरा; जयकुमार गोरेंच्या हाती माढ्याचा कासरा

बावनकुळे यांनी सातारा लोकसभेबाबत कोअर कमिटीमधील सर्व सदस्यांची वैयक्तिक मते जाणून घेतली. या वेळी सर्वांनीच सातारा लोकसभा Satara Loksabha ही भाजपच्या कमळ याच चिन्हावर लढविण्याचा आग्रह धरला. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम Dhairyasheel Kadam म्हणाले, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे काम संपूर्ण जिल्ह्यात, प्रत्येक बूथवर शेवटच्या घटकापर्यंत पोचवले असल्याचे सांगितले.

या वेळी भाजपच्या किसान मोर्चा उपक्रमाचा आढावा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. बावनकुळे यांनी सर्वांनी महायुतीचे काम पूर्ण क्षमतेने करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना पाठिंबा देणारा खासदार सातारा लोकसभेतून निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाने दिलेला संदेश घरोघरी पोचवावा. प्रत्येक मतदारांशी संपर्क करावा, असे सांगून केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे काम केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्यांच्या भावना विचारात घेऊन लवकरच सातारा लोकसभेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले.

Edited By : Rashmi Mane

R

Chandrashekhar Bawankule
Madha Loksabha Constituency : निंबाळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी की सर्वसहमती?; पवारांच्या निर्णयाकडे माढ्याचे लक्ष...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com