Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात दुपारपर्यंत इतके टक्के मतदान, तर 'या' गावाचा मतदानावर बहिष्कार

Satara Lok Sabha: सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या मतदानासाठी चुरस दिसत आहे. सुरवातील धिम्या गतीने होणाऱ्या मतदानाने आता वेग घेतला आहे. उन्हाची तीव्रता वाढूनही मतदानातील उत्साह सकाळी व दुपारच्या टप्प्यात चांगला होता.
Satara Loksabha
Satara LoksabhaSarkarnama

Satara Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघात आज सकाळी (7 मे) सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. सुरवातीला धिम्या गतीने सुरु झालेल्या मतदानाने सकाळी अकरनंतर वेग घेतला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत त्यामुळे 32.78 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात 33.93 टक्के, तर सर्वात कमी मतदान वाईमध्ये 31.29 टक्के इतके आहे. (Satara Lok Sabha Constituency)

सातारा विधानसभा मतदारसंघात 33.05 टक्के, वाई विधानसभा मतदारसंघात 31.29, पाटण विधानसभा मतदारसंघात 33.09 टक्के , कराड उत्तर 33.46, कराड दक्षिण 31.97 टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरापर्यंत माढा मतदारसंघात समाविष्ट माण मतदारसंघात 11.04 टक्के तर फलटण मतदारसंघात सर्वाधिक 18.54 टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत 32.78 टक्के मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात 33.93 टक्के, तर सर्वात कमी मतदान वाई 31.29 टक्के आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या मतदानासाठी चुरस दिसत आहे. सुरवातील धिम्या गतीने होणाऱ्या मतदानाने आता वेग घेतला आहे. उन्हाची तीव्रता वाढूनही मतदानातील उत्साह सकाळी व दुपारच्या टप्प्यात चांगला होता.

खोडशीतील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, खोडशी (ता. कराड) येथील ग्रामस्थांनी मतदानादिवशीच मतदान न करण्याचा निर्णय घेत बहिष्कार टाकला आहे. गायरान जमिनीवरील प्लॉट धारकांना जागा वाटप करण्याकडे प्रशासनाने दूर्लक्ष केल्यामुळे येथील ग्रामस्थ नाराज असल्यामुळे त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला.

Satara Loksabha
Dattatray Bharne : माझ्याशी गाठ आहे, एकेकाची वाटच लावेन; आमदार दत्तामामा भरणेंची दमदाटी

सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सकाळच्या सत्रातच मतदान करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कुटुंबासह एकत्र जाऊन सकाळी सात वाजून सात मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होते. दुपारी एकनंतर उन्हाचा कडका वाढूनही अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळत होत्या. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनीही कुटुंबासह लासुर्णे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com