Satara Lok Sabha Constituency: स्पष्टवक्ते, आक्रमक अन् लोकांमध्ये मिसळणारे उदयनराजे

Satara Political News : उदयनराजे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांना एक राजघराण्याचे वलय आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही ते आपलेसे वाटतात. भावनिक स्वभाव असल्याने लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. स्पष्टवक्तेपणा, आक्रमकपणा व साधी राहणी तसेच सर्वसामान्य जनतेची बाजू घेण्याकडे त्यांचा कल असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळतो.

राजघराण्यातील असूनही त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथे त्यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाल्यामुळे ते महसूल राज्यमंत्री झाले.

भाजपशी दुरावा निर्माण झाल्यानंतर अल्पवेळ ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सलग तीन पंचवार्षिक ते खासदार झाले. पण, मोदी लाटेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा निर्णय चुकला. त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता ते भाजपकडून राज्यसभेचे खासदार असले तरी सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांना आगामी निवडणूक लढवायची आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार केले. 2009 ते 2019 पर्यंत उदयनराजे भोसले यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी दोनच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. हा पराभव भरुन काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतले आहे. सध्या ते 2024 साठी सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार मानले जात आहेत.

Udayanraje Bhosale
Year Ender 2023: अजितदादांचं बंड ते मणिपूरमधील संघर्ष; वर्षातील 10 मोठ्या घडामोडी !

नाव (Name)

उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले

जन्मतारीख (Birth Date)

24 फेब्रुवारी 1966

शिक्षण (Education)

प्राथमिक शिक्षण देहरादून येथे तर 12 वीपर्यंतचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन इंजिनीयरिंग (डीआयबीएम) केले आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा लाभला असून ते तेरावे वंशज आहेत. उदयनराजे भोसले हे सध्या श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंहराजे भोसले यांच्यासोबत सातार्‍यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी राहतात. 20 नोव्हेंबर 2003 रोजी दमयंतीराजे यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांना वीरप्रतापसिंहराजे आणि नयनताराराजे अशी दोन मुले आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

सातारा

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

उदयनराजेंची राजकीय कारकीर्द नगरसेवक पदापासून सुरू झाली. 1991 मध्ये ते सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1996 मध्ये सातारा लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1998 च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपमधून उदयनराजे निवडून आले. त्यांना महसूल राज्यमंत्रिपद देण्यात आले. भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती.

त्यानंतर भाजपला सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसमध्ये अल्पकाळ राहिले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीतून लोकसभेवर निवडून आले. 2019 मध्ये भाजपच्या लाटेत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत निवडणुकीनंतर दोन महिन्यांतच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 2019 च्या सातारा लाोकसभेच्या पाोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपने राज्यसभेवर घेतले.

Udayanraje Bhosale
Sanjay Raut : हायप्रोफाईल आरोपींना मदत..., संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सातारा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर दोनच महिन्यांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन ते भारतीय जनता पक्षात गेले. त्यानंतर झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. राष्ट्रवादीने त्यांना तीनवेळा खासदार केले. त्याच मतदारसंघात केवळ विकासकामांच्या मुद्द्यावर त्यांनी खासदार झाल्यानंतर दोन महिन्यांत ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील मतदारांना रुचला नाही. त्यातच खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात भिजत घेतलेल्या सभेने सातारकरांनी परिवर्तन घडवले. त्यामध्ये उदयनराजेंचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील विजयी झाले.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

संपूर्ण मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून त्यांचे कार्यकर्ते सर्व तालुक्यांत आहेत.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर त्यांना नेटकरी चांगलेच उचलून धरतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाइल तरुणाईला भुरळ घालते. त्यांच्यासाोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची झुंबड उडते. ट्विटरवर त्यांचे तीन लाख 19 हजार फॉलोअर्स आहेत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

खासदार उदयनराजे हे आपल्या विधानांनी कायमच चर्चेत असतात. पोपटासारखे आमचे बंधूराज एवढे गोड बोलतात अशा शब्दात शिवेंद्रराजेंवर त्यांनी टीका केली होती. राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते..., जातीपातीचे राजकारण सोडून द्या अन्यथा देशाचे तुकडे होतील, राजेशाही असती तर राज्यपालांचा कडेलोटच केला असता... मोदी हो तो क्या हुवा, आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे. तो कोण मोठा लागून गेला...., पक्षबिक्ष गेला खड्ड्यात... ही त्यांची काही गाजलेली विधाने आहेत.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

राजमाता कल्पनाराजे भोसले, कृषितज्ज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे तरुणाईत त्यांची क्रेझ आहे. सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे असोत ते जातीने लक्ष घालून करून देतात. त्यांचे देशभरात चाहते आहेत. एखाद्या प्रसंगाने ते लगेच भावनिक होतात. कार्यकर्त्यांसाठी ते 24 तास उपलब्ध असतात. त्यांच्याकडे एखादा विषय, प्रश्न गेला तर ते त्याची तड लावतात. स्पष्टवक्तेपणा, आक्रमकता, साधी राहणी यामुळे त्यांची छाप पडते. सर्व राजकीय पक्षांत त्यांचे चाहते आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

उदयनराजेंचा स्वभाव जेवढा मृदू तेवढेच ते आक्रमक आहेत. त्यामुळे एखाद्या बाबतीत चुकीचे काही घडल्यास ते विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांवरही टीका करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. स्पष्टवक्तेपणामुळे ते कधी कधी पक्षातील नेत्यांचीही अडचण करतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी त्याचे मतांत रुपांतर होत नाही. कराड, पाटण मतदारसंघात त्यांचा फारसा संपर्क नसल्याने त्यांना येथून विजयासाठीची मते मिळत नाहीत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही, तर ते अपक्ष उभे राहू शकतात. परिणामी, पक्षाच्या मतांची विभागणी होऊन विरोधी उमेदवाराला फायदा होऊ शकतो. तसेच ते भाजप सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये जाऊ शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या उमेदवारांची अडचण करू शकतात.

(Edited By Ganesh Thombare)

Udayanraje Bhosale
Nanded BJP News : कोणी कितीही काड्या केल्या, तरी दोनवर्ष मीच जिल्हाध्यक्ष..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com