Marathwada Political News : लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यावर आल्या आहेत. राज्यात भाजपने `मिशन 45` हाती घेतले आहे, मात्र नांदेड जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे नवनविन प्रकरणं समोर येत आहेत. (Nanded BJP News) भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातील आमदारांमधील बेबनावाची चर्चा सुरू असतांनाच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी आपल्याला पदावरून हटवण्यासाठी अनेकजण काड्या करत असल्याचा आरोप केला.
कुणी किती बी काड्या करा, पण 2026 पर्यंत मीच अध्यक्ष राहणार, अशा शब्दात त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना आव्हान दिले आहे. (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `मन की बात` या कार्यक्रमाचे रविवारी (ता. 31) देशभरात प्रसारण करण्यात आले. अर्धापूर शहरात हा कार्यक्रम पाहण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी गेली होती. मोदींच्या मन की बात नंतर याच कार्यक्रम ठिकाणी (Nanded) नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी आपली `मन की बात` सांगून टाकली.
`माझ्या विरुद्ध कोणी किती बी काड्या केल्या, तरी मीच २०२६ पर्यंत अध्यक्ष राहणार`, असे सांगत पक्षांतील विरोधकांना एक प्रकारे जाहीर आव्हानच दिले. (Marathwada) संघटनात्मक पातळीवर भाजपात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संघटनात्मक पातळीवर बांधणी करतांना नांदेड जिल्ह्याची जम्बो कार्यरणी काही महिन्यांपूर्वी घोषीत करण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नांदेड उत्तरच्या अध्यक्षपदी किनवट येथील सुधाकर भोयर यांची निवड करण्यात आली आहे. भोयर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भोकर, मुदखेड, अर्धापूर, हादगाव, माहुर, किनवट, हिमायतनगर या सात तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर केली. तालुकाध्यक्ष निवडतांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असल्याची भावना कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करत आहेत. काही नाराज कार्यकर्त्यांनी नागपूरला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनकडे नाराजी व्यक्त केली.
अर्धापूर शहरात भारतीय जनता पक्षाचे गटनेते बाबुराव लंगडे यांच्या निवासस्थानी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा नांदेड उत्तरच्या कार्यकारिणीची बैठक व `मन की बात` या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, अनुसूचित जाती मोर्चोचे प्रदेश महामंत्री सर्जेराव जाधव, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मण इंगोले आदी उपस्थित होते.
या बैठकीला खासदार चिखलीकर यांनी मार्गदर्शन केले व ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यांनतर या बैठकीला सुधाकर भोयर यांनी मार्गदर्शन केले. संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून 2024 मध्ये महा विजय संपादन करण्यासाठी जीवाचे रान करा, असे आवाहन केले. तसेच 2026 पर्यंत मीच अध्यक्ष राहणार आहे. कोणी किती बी काड्या केल्या, तरी पक्षाचे काम करित राहणार, असे सांगत त्यांना पक्षांतर्गत विरोधकांना ठणकावून सांगितले. महाविजयाची तयारी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना नांदेड मध्ये नेमके काय चाललंय हे पाहावे लागणार आहे. तरच `मिशन 45 प्लस` यशस्वी होऊ शकेल.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.