Satara NagarPalika: शिवेंद्रराजेंनी कट्टर समर्थकाला नगराध्यक्षपदावर बसवलं; आता उपनगराध्यक्ष अन् सभापतींच्या खुर्चीसाठी उदयनराजे समर्थकांची फिल्डिंग

Deputy Mayor Election : सातारा पालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते पदभार स्वीकारण्याच्या तयारीत असून उपनगराध्यक्ष व विषय समिती निवडींसाठी राजकीय गटांत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Satara Municipal politics intensifies as newly elected Mayor Amol Mohite meets MP Udayanraje Bhosale, triggering discussions on Deputy Mayor and committee chairmanship selections.
Satara Municipal politics intensifies as newly elected Mayor Amol Mohite meets MP Udayanraje Bhosale, triggering discussions on Deputy Mayor and committee chairmanship selections.Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी निवड झालेल्या अमोल मोहिते यांनी नुकतीच भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच पदभार स्वीकारतील. मात्र, आता उपनगराध्यक्षांसह विषय समितीच्या निवडींबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोणाची कुठे वर्णी लागणार? याची सातारकरांना उत्सुकता आहे.

साताऱ्याचाच पदभार राहिला

जिल्ह्यात नऊ पालिका व एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड प्रक्रिया पार पडली. निकाल लागल्यनंतर सातारा वगळता अन्य सर्व पालिकांतील नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला; परंतु निकालाला 4 दिवस उलटले, तरी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, त्यांनी पुणे येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे ते लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच

नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली आहे; परंतु उपनगराध्यक्षपद हे निवडून आलेल्या नगरसेवकांमार्फत निवडले जाणार आहे. पालिकेची निवडणूक दोन्ही राजांनी कमळाच्या चिन्हावर लढवली. जागांच्या वाटाघाटीत नगराध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळविण्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी यश मिळवले. त्यामुळे आता उपनगराध्यक्षपदावर खासदार उदयनराजे गटाचा प्रबळ दावा असणार आहे.

त्यानुसार उदयनराजे गटातील नगरसेवकांमध्ये या पदावर वर्णी लावण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आजवर ॲड. दत्तात्रय बनकर हे पालिकेत उदयनराजे गटाचे प्रतिनिधित्व करत होते. या वेळी त्यांनाच संधी मिळणार की नव्या दमाच्या नव्या विचारांच्या कार्यकर्त्याला संधी मिळणार, याबाबत सातारकरांमध्ये उत्सुकता आहे. जागा वाटपामध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा पकडून त्यासाठी शिष्टाई केली जात आहे.

सभापतिपदी कोणाची वर्णी?

पालिकेचा कारभार करत असताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाबरोबरच विविध विषय समित्यांच्या सभापतींचे स्थानही तेवढेच महत्त्वाचे आहे. पालिकेत नियोजन, बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती अशी पदे असतात. या पदावर आपल्याला संधी मिळावी, यासाठी नवनिर्वाचित मेहरबानांनी फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

नगराध्यपद शिवेंद्रराजे गटाकडे असल्याने सभापतिपदात उदयनराजेंना झुकते माप आवश्यक असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे; परंतु अद्याप कोणत्या गटाला किती सभापतिपदे मिळणार, हे निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सभापतिपद कोणाला मिळते, याकडेही नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Satara Municipal politics intensifies as newly elected Mayor Amol Mohite meets MP Udayanraje Bhosale, triggering discussions on Deputy Mayor and committee chairmanship selections.
Shivsena Vs BJP : 'तुमच्या भागात कधी शिवसेना वाढू दिली नाही... कधी नगरसेवकही झालेला नाही' : नीलम गोऱ्हेंविरोधात कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक

दालनांची साफसफाई

लोकनियुक्‍त कार्यकारिणीची मुदत संपल्‍यानंतर गेल्‍या साडेतीन वर्षांहून अधिक काळ सातारा पालिकेचा कारभार प्रशासकांच्‍या मार्फतीने सुरू होता. विविध कारणांमुळे लांबलेली निवडणूक नुकतीच पार पडली. नगराध्यक्षांसह त्‍यांच्‍यासह इतर कार्यकारिणीतील मुख्‍य पदांचा पदभार दोन्‍ही राजांच्‍या सूचनेनुसार इतर नगरसेवक स्‍वीकारणार आहेत. यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सभापतींच्‍या दालनाची सफाई, डागडुजी, रंगरंगोटी करण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले होते. हे काम पूर्ण होत आले आहे.

Satara Municipal politics intensifies as newly elected Mayor Amol Mohite meets MP Udayanraje Bhosale, triggering discussions on Deputy Mayor and committee chairmanship selections.
Congress strategy : महादेव जानकरांचा भाजपवर बॉम्बगोळा! महायुतीसोबतचा संसार मोडण्याचे कारणच जगजाहीर केले!

लोकनियुक्‍त कार्यकारिणीची पहिली सर्वसाधारण सभा देखील होणार आहे. त्यासाठी पालिकेच्‍या छत्रपती सभागृहातील बैठक व्‍यवस्‍थेत सुधारणा करण्‍यात येत आहे. हद्दवाढीनंतर पालिकेच्‍या नगरसेवकांची संख्‍या 50 झाली असून, त्‍यांना सामावून घेणारी आसनव्‍यवस्‍था देखील सुसज्‍ज करण्‍यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com