Congress strategy : महादेव जानकरांचा भाजपवर बॉम्बगोळा! महायुतीसोबतचा संसार मोडण्याचे कारणच जगजाहीर केले!

Rashtriya Samaj Party allianceNews : काँग्रेसने महाविकास आघाडीची साथ सोडत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या सोबतीला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आला आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात येत्या काळात 29 महानगरपालिकांच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चर दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने युती व आघाडीची चाचपणी सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच आता काँग्रेसने महाविकास आघाडीची साथ सोडत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या सोबतीला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आला आहे.

या दोन पक्षांची युती होणार असल्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यातच आता माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर बॉम्बगोळा टाकला असून त्यांच्यासोबतचा संसार मोडण्याचे मोठे कारण त्यांनी सर्वांसमोरच सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी काँग्रेससोबत नवी मोट बांधली आहे. आगामी काळात होत असलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका रासप काँग्रेससोबत लढणार असल्याची घोषणा त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यातच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याचे कारण सांगितले आहे.

Mahadev Jankar
Pune municipal election : भाजपसोबत चर्चा, पण जागावाटपात दगाफटका झालाच तर..., पुण्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी तयार ?

रासपची आता काँग्रेससोबत (Congress) आघाडी झाली आहे. आम्ही 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. जागावाटपाबद्दल अंतिम चर्चा सुरु आहे सगळीकडे आमचे उमेदवार अर्ज भरत आहेत, अंतिम चर्चेनुसार कुठले उमेदवार फायनल करायचे हे ठरवू, असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले. आम्ही सगळीकडे ताकद लावत आहोत. मुंबईत आम्ही 25 ते 30 जागा लढवण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
BJP Rebel Fear : भाजपला सतावतेय बंडखोरीची भीती, बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये खदखद!

आमची गेली अनेक वर्ष भाजपसोबत युती होती. मात्र, भाजपसोबतच्या युतीमध्ये असताना आम्हाला काही कटू अनुभव आले. त्यामुळे त्यांच्यासोबतचा संसार मोडण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. येत्या काळात जर काँगेसने सन्मानजनक वागणूक दिली तर आम्ही काँग्रेसोबत राहू नाहीतर आमचा स्वतंत्र पक्ष आहेच, असे यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
Shivsena Politics : ऐन निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! पक्षातून कार्यकर्त्याची हकालपट्टी करताच माजी महापौरांनी दिला राजीनामा

लोकसभेला भाजपसोबत महायुती होती. तर विधानसभा निवडणूका आम्ही स्वतंत्र लढल्या आणि आता महानगरपालिकांसाठी काँग्रेसच्या सोबत आहोत, असे मत महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. आमचा पक्ष भाजप किंवा काँग्रेसने काढला नाही आम्ही स्वतः काढला आहे. आमच्या पक्षाची संघटना वाढवण्याचे अधिकार आम्हाला आहेत, असे जानकर म्हणाले.

Mahadev Jankar
Shinde ShivSena And Pawar NCP : एकमेकांविरोधात लढ-लढ लढल्या अन् पुन्हा एकत्र आल्या; शिंदे अन् पवारांच्या शिलेदारांची अजब मैत्री!

काही दिवसांपूर्वीच महादेव जानकर हे राज व उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जल्लोष मेळाव्यात दिसून आले होते. त्यानंतर जानकर महाविकास आघाडीसोबत येतील, असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी काँग्रेससोबत युती केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत या आघाडीची घोषणा केली होती. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

Mahadev Jankar
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com