Satara IT Raid: संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Income Tax Department Raids in sanjeevraje naik nimbalkars house: सकाळी सहा वाजल्यापासूनचसंजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरु आहे.
 sanjeevraje naik nimbalkars
sanjeevraje naik nimbalkarsSarkarnama
Published on
Updated on

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे.

आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बंगला परिसरात पोलिस पथक तैनात आहे.

 sanjeevraje naik nimbalkars
Arvind Kejriwal: मतदानापूर्वीच केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल; यमुनेच्या पाण्यात विष?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा टाकला असल्याचे बोलले जाते. रघुनाथराजे आणि संजीवराजे हे दोघे रामराजे यांचे चुलत बंधू आहेत.

 sanjeevraje naik nimbalkars
Sonia Gandhi: राष्ट्रपतींना 'बिचारी महिला' म्हणणाऱ्या सोनिया गांधी अडचणीत? पप्पू यादव यांनाही विशेषाधिकार भंगाची नोटीस

आयटी विभागाच्या या कारवाईचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधानसभा निवडणुकीआधी संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.

आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, अशी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com