MP Shriniwas Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी; खासदार श्रीनिवास पाटील बॅनरवरून गायब

Satara NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटकडून 2024 ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'विजय निश्चय मेळावे' घेण्यात येत आहेत.
Satara NCP Politics
Satara NCP Politics Sarkarnama

Satara News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून 2024 ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'विजय निश्चय मेळावे' घेतले जावू लागले आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यात होत असलेल्या विजय निश्चय मेळाव्यातून पक्षातील गटबाजीचे राजकारण समोर येवू लागले आहे. या मेळाव्याच्या बॅनरवरून चक्क विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच गायब करण्यात आले होते. मात्र, मेळावा सुरू होण्याअगोदर पुन्हा खासदारांना स्थान दिले गेले असल्याने प्रदेशाध्यक्षांनी कान टोचले असल्याचा सूर कार्यक्रमस्थळी आता उमटू लागला आहे. (Satara NCP MP Shriniwas Patil)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस सातारा जिल्ह्यात 'विजय निश्चय मिळावे' घेणार आहेत. यामध्ये पाटण, उंब्रज, कोरेगाव, माण-खटाव ठिकाणी कार्यकर्त्यांचे मिळावे होत आहेत. या मेळाव्याची तयारी सुरू असताना पाटण विधानसभा मतदारसंघ आणि कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजय निश्चय मेळाव्यातील बॅनरवरून खासदार श्रीनिवास पाटील यांना स्थान दिले गेले नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satara NCP Politics
Ganpat Gaikwad Politics : निमित्त गणपत गायकवाडांचे, निशाणा देवेंद्र फडणवीसांवर; नरेंद्र पवारांचा भाजपला घरचा आहेर

तसे बॅनरही सोशल मीडियावर फिरले असून काही ठिकाणी फ्लेक्सही झळकले आहेत. मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यात दाखल होताच मेळाव्याच्या स्टेजवरती असलेल्या बॅनरवरील गाखब खासदार श्रीनिवास पाटील यांना स्थान दिले गेले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी कोणाचे कान टोचले ? त्यामुळे गायब झालेले खासदार बॅनरवर दिसू लागले असा सूर कार्यकर्त्यांच्यात कार्यक्रमस्थळी उमटू लागला आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजी समोर

राष्ट्रवादीत राज्य पातळीवर फूट पडली असून सातारा जिल्ह्यात शरद पवार गटातील गटबाजी समोर आली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांना गेल्या पोटनिवडणुकीत पक्षाने आणि शरद पवारांनी आदेश दिल्याने निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात एकमेव तगडा उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांचे नाव समोर आले. आता वयोमानानुसार खासदार पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. मात्र, खासदार पुत्र सारंग पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी ही गटबाजी समोर आली आहे.

पुत्र प्रेमामुळे डावलले ?

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आगामी निवडणुकीत लोकसभेला नवा चेहरा रिंगणात असणार असल्याने सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर हे इच्छुक आहेत. पुत्र प्रेमामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलले असल्याचे खासदारांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Satara NCP Politics
Lok Sabha Election 2024 : खतगावकरांची आता काँग्रेसला साथ; चिखलीकरांचा दिल्लीमार्ग खडतर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com