Lok Sabha Election 2024 : खतगावकरांची आता काँग्रेसला साथ; चिखलीकरांचा दिल्लीमार्ग खडतर ?

Nanded Loksabha Constituency : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आणि त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Bhaskarrao Patil Khatgaonkar, Pratap Patil Chikhlikar, Ashok Chavan
Bhaskarrao Patil Khatgaonkar, Pratap Patil Chikhlikar, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: राजकारणात कोणता नेता कुठल्या क्षणी कुठच्या पक्षात असेल याचा काही नेम नाही. गेल्या पाच वर्षाच्या राज्यातील राजकारणात हे पदोपदी जाणवले. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातही अशा अनेक घडामोडी घडल्या आणि त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आलेली असतांना या सगळ्या गोष्टीचा सद्यस्थितीवर काय परिणाम होईल ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांचा प्रभाव राहिला आहे. या दोन नेत्यांच्या भूमिका कुठल्याही निवडणुकीत महत्वाच्या ठरतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असतांना अशोक चव्हाण यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. डी.बी.पाटील यांच्यावर 84 हजारांच्या मताधिक्याने चव्हाण यांनी विजय मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhaskarrao Patil Khatgaonkar, Pratap Patil Chikhlikar, Ashok Chavan
MP Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांच्या पतंगाला हवा कोण देणार ?

विशेष म्हणजे त्यांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर हेही तेव्हा त्यांच्यासोबतच होते. या दोघांमध्ये राजकीय मतभेद असले तरी तेव्हा अशोक चव्हाण यांना खतगावकरांची मदत झाली होती, असे बोलले जाते. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खतगावकरांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून आले.

खतगावकर भाजपवासी झाले, तर दुसरीकडे वंचित-'एमआयएम' आघाडीच्या उमेदवारामुळे दलित-मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फटकाही अशोक चव्हाणांना बसला. परंतु ज्या चिखलीकरांसाठी खतगावकरांनी आपली शक्ती वापरली त्यांच्याशीच कालांतराने वाद होऊ लागले. काँग्रेस सोडल्यामुळे अशोक चव्हाणांशी असलेले संबंधही ताणले गेले होते. परंतु राजकारणात जसं कोणी कायम शत्रू किंवा मित्र नसतो, त्या नियमानुसार अशोक चव्हाण यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल डोळ्यासमोर ठेवून दोन पावलं मागे घत राजकीय हुशारी दाखवली.

खतगावकरांच्या घरवापसीसाठी पायघड्या अंथरल्या आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत खतगावकर यांनी आपला करिश्मा दाखवला. आता 2024 च्या लोकसभेत तो दिसणार का ? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. चिखलीकरांना खासदार करण्यात ज्या खतगावकरांचा गेल्यावेळी हात होता, तो आता अशोक चव्हांणासोबत आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा दिल्ली गाठण्याचा चिखलीकरांचा मार्ग काहीसा कठीण होणार आहे.

गेल्या निवडणुकीत नायगाव, मुखेड, देगलुर विधानसभा मतदारसंघात चिखलीकरांना खूप मोठे मताधिक्य मिळाले होते. यात खतगावकरांचा खूप मोठा वाटा होता. अशोक चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण करत खतगावकरांची घरवापसी करून घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नांदेडच्या जागेसाठी डॉ.मिनल पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करायची असेल तर चिखलीकरांना देगलुर, बिलोली, मुखेड नायगाव या भागात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश आ़ंतपूरकर हे 40 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. या विजयात खतगावकरांचा मोठा वाटा होता. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी या भागातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते‌. या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांच्या दुसऱ्या दिल्लीवारीचा मार्ग खडतर असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Bhaskarrao Patil Khatgaonkar, Pratap Patil Chikhlikar, Ashok Chavan
Uddhav Thackeray : दिवस बदलतात, उद्या आमचेही येतील, तेव्हा सोडणार नाही; ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com