Makrand Patil : जयकुमार गोरेंनी केलेली कोंडी मकरंदआबांनी फोडली : शिंदेंच्या कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश; अरुणादेवी पिसाळांच्या लेकीविरोधात उतरणार मैदानात

Jaykumar Gore setback : सातारा जिल्ह्यात विराज शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Former Youth Congress leader Viraj Shinde and supporters join NCP Ajit Pawar faction in the presence of minister Makrand Patil at Kisan Veer factory in Satara.
Former Youth Congress leader Viraj Shinde and supporters join NCP Ajit Pawar faction in the presence of minister Makrand Patil at Kisan Veer factory in Satara.Sarkarnama
Published on
Updated on

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांनी मागील 3 दिवसांत वाई आणि खंडाळा तालुक्यातील 3 मोठ्या नेत्यांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश करवून घेतले. यातून मंत्री मकरंद पाटील यांची मोठी कोंडी केल्याचे दिसून आले. पाटील यांनीही ही कोंडी फोडत गोरे यांना धक्का दिला आहे.

मागील 3 दिवसांत जयकुमार गोरे यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, मग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, माजी सभापती शशिकांत पिसाळ अन् मग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला.

याला प्रत्युत्तर म्हणून युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, पंचायत समितीच्या माजी सदस्य ऋतुजा शिंदे यांचा मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. विराज शिंदे हे मंत्री गोरे आणि मदन भोसले यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यासह समर्थकांच्या पक्षप्रवेशाने मंत्री गोरे, भोसले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आता बावधन जिल्हा परिषद गटातून अरुणादेवी पिसाळ यांच्या मुलगी दीप्ती पिसाळ विरुद्ध ऋतुजा शिंदे अशी लढत बघायला मिळणार आहे.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा सुसंस्कृत आणि यशवंत विचारांचा जिल्हा आहे. परंतु तालुक्यात विष पेरण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले, त्यावेळी काही लोकांनी शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता; परंतु ते आज स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये गेले आहेत.’’

Former Youth Congress leader Viraj Shinde and supporters join NCP Ajit Pawar faction in the presence of minister Makrand Patil at Kisan Veer factory in Satara.
Satara ZP Elections : मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी; मित्रपक्षांसह 'मविआ'समोर मोठं आव्हान

नुकत्याच झालेल्या वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत अंतस्थ मतभेदांमुळे अपयश वाट्याला आले; परंतु आज विराज शिंदे यांच्या घरवापसीमुळे ही उणीव नक्की भरून निघणार आहे. त्यांचे वडील कारखान्याचे माजी संचालक रतन शिंदे यांचे कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. जवळ घेऊन गळ्यावर सुरी फिरविणारे संस्कार आमच्यावर नाहीत. विश्वास आम्ही तोडणार नाही, असा शब्द यावेळी मंत्री पाटील यांनी दिला.

Former Youth Congress leader Viraj Shinde and supporters join NCP Ajit Pawar faction in the presence of minister Makrand Patil at Kisan Veer factory in Satara.
Satara ZP : हातावर देवेंद्र पण हृदयात शंभुराज देसाई? CM फडणवीस पाठिशी असूनही लाडक्या नेत्याला हवीय शिवसेना मंत्र्याची सोबत

ऋतुजा शिंदे म्हणाल्या, ‘‘देशाचे नुकसान करणाऱ्या आणि समाजामध्ये विष पेरणाऱ्या लोकांसोबत जाण्यापेक्षा समविचारी पक्षासोबत जाऊन आपल्या भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन.’’ विराज शिंदे म्हणाले, ‘‘चौदा वर्षांनंतर स्वगृही परतल्याचा आनंद वाटत आहे. भाजप पक्षाची विचारसरणी ही समाजासाठी घातक आहे. माझ्या बावधन गटातील सर्वांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून आमचा स्वीकार केलात. इथून पुढच्या काळात सर्वांना सोबत घेऊन एकमताने काम करू.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com