Pune Police: पुणे 'कार'नामा; आरोपीच्या बापाचा डॉक्टरांना आला फोन अन् रक्ताचे सॅम्पल डस्टबिनमध्ये...

Pune Porsche Car Accident:अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि डॉ तावरे यांचा संपर्क झाला असून त्याबाबतची टेक्निकल पुरावे पोलिसांकडे असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
Pune Porsche Car Accident:
Pune Porsche Car Accident:Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) ससून मध्ये कार्यरत असणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणातील मोठ खुलासे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'आरोपींवर 304 मधील गुन्ह्यात आता 120 ब अंतर्गत, 460, 213, 214 हे कलम लावण्यात आले आहेत. अल्पवयीन आरोपीचे 19 तारखेला ब्लड सँपल घेण्यात आले ते दुसऱ्याच्या रक्ताचे सँपल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन तरुणाचे ब्लड सँपल घेतले आणि ते डस्टबिन मध्ये फेकून दिले. त्याच्या जागी दुसऱ्या कुणाचे तरी ब्लड सॅम्पल घेऊन ते अल्पवयीन तरुणाचे असल्याचे सांगण्यात आले.

Pune Porsche Car Accident:
Pune Porsche Car Accident: पोलिसांनी लढवली शक्कल अन् ससूनच्या डॉक्टरांचे बिंग फुटलं! पोलिसांची चतुराई...

डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्यास समोर आले आहे. ससून मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले .

डॉ. श्रीहरी यांनी ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ब्लड सॅम्पलच्या साठ्यामधून ते उचलण्यात आले असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांचा देखील सहभाग आहे का? हे तपासण्यासाठी ससूनमधील सीसीटीव्ही आणि डीसीआर ताब्यात घेण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ससूनमधील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलल्याने रिपोर्टमध्ये अल्पवयीन मुलाने मद्य सेवन न केल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि डॉ तावरे यांचा संपर्क झाला असून त्याबाबतची टेक्निकल पुरावे पोलिसांकडे असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. रक्ताच्या रिपोर्टमध्ये अल्पवयीन आरोपीने मद्य सेवन केले नसल्याचे जरी आढळले तरी या खटल्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com