
प्रभाग रचना जाहीर: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज (3 सप्टेंबर 2025) प्रसिद्ध होणार आहे, ज्यामुळे इच्छुकांचे नशीब ठरणार आहे.
हरकती आणि सूचना: नागरिक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवू शकतात, ज्या स्थायी समिती सभागृहात उपलब्ध असतील.
राजकीय रणनीती: महायुती आणि महाविकास आघाडी यांचे नेते प्रभाग रचनेतील बदलांचा बारकाईने अभ्यास करत आहेत, विशेषतः सतेज पाटील यांची काँग्रेस टीम सक्रिय आहे.
प्रभाग बदलांचा प्रभाव: नव्या रचनेत काही प्रभाग तुटले किंवा जास्त मतदार मिळाले, याचा उमेदवारांच्या निवडीवर परिणाम होणार आहे.
निवडणूक तयारी: प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीतीला गती मिळेल, विशेषतः डिसेंबर-जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी.
Kolhapur News : महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांचे नशीब आज उजाडणार आहे. सर्व पक्षांचे लक्ष लागलेली प्रारूप प्रभागरचना आज प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र महायुतीमधील इच्छुकांचे मनसुबे उजळण्यासाठी देखील काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची टीम सज्ज आहे. नव्या प्रभाग रचनेतून कुणाचा प्रभाग तुटला, कुणाकडे जास्त आला, हक्काचे मतदार गेले का? याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोणत्या रिंगणातून कोण उतरणार की थांबणार, नवीन कोणाला संधी मिळणार या साऱ्यांची प्राथमिक उत्तरे मिळणार आहेत. मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात प्रारूप प्रभागरचना पाहण्यासाठी उपलब्ध होणार असून, त्यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवायच्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने निवडणूक प्रक्रिया सुरू केली. महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना ठरवली आहे. त्यामुळे 81 सदस्यांसाठी 20 प्रभाग होणार आहेत. त्यातील 19 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग पाच सदस्यांचा होणार आहे. रचना करताना 24 हजारांपासून जास्तीत जास्त 35 ते 37 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग राहणार आहे. 11 जूनपासून सुरू झालेल्या प्रक्रियेनुसार 8 ऑगस्टला प्रारूप नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आले. आता आयोगाने प्रारूप रचनेस मान्यता दिली असून, उद्या ती रचना जाहीर केली जाणार आहे.
उत्तरेपासून सुरू झालेल्या रचनेत कोणता प्रभाग कसा तयार झाला, कोणते प्रभाग एकत्र आले, कोणते बाजूला गेले, पाच सदस्यांचा प्रभाग कोणता झाला, हे सारे प्रारूपमधून स्पष्ट होणार आहे. प्रारूप प्रभागरचना ही जवळपास तशीच राहते. हरकत महत्त्वाची असेल तर त्यात थोडाफार बदल केला जातो.
त्यामुळे या रचनेवरच अनेक इच्छुक पुढील तयारीला लागतात किंवा थांबतात. अंतिम प्रभागरचना झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. त्यात प्रभागांची आरक्षण सोडत महत्त्वाची असून त्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम राबवला जाईल. यासाठी डिसेंबरअखेरपर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
अशी होणार पुढील प्रक्रिया
हरकती आणि सूचना मागवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यावर 22 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घ्यायची आहे. त्यातून झालेल्या शिफारशी, दुरुस्तीनुसार त्या अधिकाऱ्याने अंतिम केलेली प्रभागरचना 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागास सादर करायची आहे. नगरविकास विभाग 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान ती अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे देणार आहे. त्यानंतर आयोगाच्या आयुक्तांकडून अंतिम केलेल्या प्रभाग रचनेची अधिसूचना 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
1. प्रभाग रचना म्हणजे काय?
प्रभाग रचना म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंघांची विभागणी, ज्यामध्ये लोकसंख्येच्या आधारे प्रभाग निश्चित केले जातात.
2. प्रभाग रचनेवर हरकती कशी नोंदवावी?
हरकती आणि सूचना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील स्थायी समिती सभागृहात लेखी स्वरूपात नोंदवता येतील.
3. प्रभाग रचनेत बदलांचा उमेदवारांवर काय परिणाम होईल?
प्रभागातील मतदारसंख्या आणि भौगोलिक बदलांमुळे काही उमेदवारांचे हक्काचे मतदार कमी होऊ शकतात, तर काहींना नवीन संधी मिळू शकते.
4. निवडणुका कधी होणार आहेत?
राज्य निवडणूक आयोगानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान होण्याची शक्यता आहे.
5. सतेज पाटील यांची भूमिका काय आहे?
काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीम प्रभाग रचनेतील बदलांचा अभ्यास करून निवडणूक रणनीती आखत आहे, ज्यामुळे महायुतीच्या इच्छुकांना आव्हान मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.