Satej Patil: शक्तीपीठ महामार्गचं समर्थन करणाऱ्या क्षीरसागरांना सतेज पाटलांचा टोला! म्हणाले, "आधी महायुतीच्या आमदारांना तुमच्या बाजूनं..."

Satej Patil: शक्तिपीठ महामार्ग समर्थन आणि विरोध यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
Rajesh Kshirsagar-Satej Patil
Rajesh Kshirsagar-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil: शक्तिपीठ महामार्ग समर्थन आणि विरोध यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. स्वाभिमानीकडून सुरू आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. त्यानंतर पेटलेल्या वादावर आमदार सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांच्या वक्तव्याची हवाच काढून टाकली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री व्हायची घाई लागली आहे, कधी एकदा आबिटकर यांना बाजूला काढून मी होतोय म्हणून शासनाची बाजू परखडपणे मांडत आहेत. क्षीरसागर यांना शक्तिपीठमध्ये पडायची गरज नव्हती, हा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या आमदारांना म्हणजे आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि कोरे यांना तुमच्या बाजूने बोलायला लावा आणि मग तुम्ही शक्तिपीठची बाजू घ्या, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांना सुनावले आहे.

Rajesh Kshirsagar-Satej Patil
Sanjay Raut: कर्करोग अन् ऑर्थर रोड तुरुंगाचा संबंध! संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा

राजू शेट्टी हे राज्याचे नेते आहेत, क्षीरसागर यांना विनंती आहे. राज्याच्या नेतृत्वावर बोलताना त्याची रिएक्शन येणारच. शक्तिपीठ हिताचा कसा वाटतोय आणि राज्याची वाट कशी लागते हे तुम्ही लोकांना सांगा. या प्रकल्पातून काय नुकसान होणार आहे. हे सांगा म्हणजे लोक निर्णय घेतील, कारण नसताना हा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या माथी हा मारला जात आहे. हे आमचं म्हणणं आहे.

एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्दची भूमिका घेतली ती खरी की खोटी, निवडणुकीच्या आधी घोषणा केली ती मतं घेण्यासाठी केली. लाडक्या बहिणींची योजना तुम्ही केली मत मिळाली आणि आता बहिणींना तुम्ही बाजूला केलं. सरकारमधल्या प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांसमोर मी कसा चांगला वाटेल, मुख्यमंत्र्यांना बरं वाटेल असं बोलायचं हे सूरू आहे, असा टोला देखील आमदार क्षीरसागर यांना सतेज पाटील यांनी लगावला.

स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय...

कायदा व सुव्यवस्था राज्यातील बिघडलेली आहे हे मी सातत्याने सांगतोय. या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. पुण्यात बापट यांना जी मारहाण झाली ती राज्याच्या दृष्टीने निषेध करण्यासारखी आहे, अशा गोष्टी होत गेल्या तर उद्या कोण कुणाला काहीही करेल अशी अवस्था आहे. राज्यातल्या जनतेला वाटले पाहिजे की आम्ही सुरक्षित आहोत. त्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी मागणी आहे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

Rajesh Kshirsagar-Satej Patil
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांचे 'रोल मॉडेल' डॉ. यशवंत ओक कोण आहेत? त्यांच्या लाऊडस्पीकर विरोधी लढ्यातून निर्माण झाला महत्वाचा कायदा

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताळ फासण्याचं काम सरकारने केलं आहे. फसवायचं काम सरकारने केलं. नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने आला तेव्हा मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळून त्यांना फसवण्यात आलं की भावना मराठा समाजाची आहे. मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढण्याचे काम केलं, परंतू सरकार या विषयाचा खेळ खंडोबा करत आहे, शिष्टमंडळात माणसं बदलली जातात दरवेळी वेगळे शिष्टमंडळ चर्चेला जातं. हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची नाही, यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काय झालं तर त्याला शासन जबाबदार असेल, असेही आमदार पाटील म्हणाले.

महायुतीच्या भांडणामुळं गोकुळ अडचणीत आल आहेत. दररोज उठून डेअऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे. महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. एकमुखी दूध उत्पादक आमच्या बाजुने राहतील अशी मला खात्री आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com