Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांचे 'रोल मॉडेल' डॉ. यशवंत ओक कोण आहेत? त्यांच्या लाऊडस्पीकर विरोधी लढ्यातून निर्माण झाला महत्वाचा कायदा

Vidyanand Bapat: पुण्यातील गणेशोत्सवात सर्वसामान्य पुणेकरांवर विपरित परिणाम करणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात चळवळ उभी करणाऱ्या विद्यानंद बापट यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Dr. Yashwant Oak_Vidyanand Bapat
Dr. Yashwant Oak_Vidyanand Bapat
Published on
Updated on

Vidyanand Bapat: पुण्यातील गणेशोत्सवात सर्वसामान्य पुणेकरांवर विपरित परिणाम करणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात चळवळ उभी करणाऱ्या विद्यानंद बापट यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांना पुणेकरांनीही मोठा पाठिंबा दिला असून लोक त्यासाठी रस्त्यावरही उतरत आहेत. पण त्यांच्या या चळवळीचे रोल मॉडेल नेमके कोण आहेत? ज्यांच्यापासून विद्यानंद बापट यांना प्रेरणा मिळाली आहे, जाणून घेऊयात.

एका मुलाखतीत बोलताना विद्यानंद बापट यांनी आपल्या लाऊडस्पीकर विरोधातील चळवळीचे रोल मॉडेल कोण आहेत? हे सांगितलं. त्यांनी म्हटलं की, "मुंबईत विलेपार्ले इथं डॉ. यशवंत ओक हे ध्वनीप्रदुषण कार्यकर्ते आहेत. सुमैरा अब्दुल अली या देखील यासंदर्भात काम करतात. हे लोक मला माहिती होते पण ते विशिष्ट रोल मॉडेल वैगरे मला वाटले नव्हते. विशेषतः ध्वनीप्रदुषणाविरोधात काम करणारे कार्यकर्ते भिंग लावून शोधावे लागतात. पण या विशिष्ट संदर्भात रोल मॉडेल वैगरे असं कोणी नव्हतं.

Dr. Yashwant Oak_Vidyanand Bapat
Tushar Bhosle: तुषार भोसलेंचं विद्यानंद बापटांना समर्थन! डीजेबंदीवर भाजप पहिल्यांदाच व्यक्त; आता नगरसेवक, आमदार, खासदारांना...

पण ओक सरांनी लिहिल्याप्रमाणं मिसेस आयझॅक म्हणून होत्या न्यूयॉर्कमध्ये १९२९-३० साली. त्यांनी त्या काळात पहिल्यांदा याविषयीची चळवळ सुरु केली होती. त्यांचाही माझ्यावर प्रभाव म्हणता येईल आणि ओक सरांनी पण तेच म्हटलंय की, त्यांच्या आणि माझ्या लढ्यात मला खूप साम्य आढळतं. क्रुसेडर स्पिरिट म्हणजेच धर्मयोध्याच्या जोशात आयझॅक यांनी त्यावेळी ही लढाई लढली होती. त्यानंतर ओक सरांनी १९७५-८० पासून २०१५ च्या काळापर्यंत ही लढाई लढली. त्यामुळं ते एक रोल मॉडेल म्हणता येईल. पण असं व्यक्ती महात्म्य असं काही माझ्याबाबत नाही"

दरम्यान, विद्यानंद बापट यांचे रोल मॉडेल असलेले डॉ. यशवंत ओक हे मूळचे मुंबईकर पेशानं वैद्यकीय डॉक्टर अन् एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी या लढाईबाबत 'एक झुंज गोंगाटाशी' नावानं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकानुसार, गोंगाट अर्थात ध्वनीप्रदुषणाविरोधात त्यांनी सुमारे ३० वर्षे लढा दिला. या काळात त्यांना प्रदीर्घ अशा ८ कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या. या लढायांमध्ये पाच जमिनी बळकावण्याच्या आणि अतिक्रमणांविरोधातील आणि तीन ध्वनी प्रदुषणासंदर्भात होत्या. आता तुम्ही म्हणलं ध्वनीप्रदुषणाचा आणि जमिनी बळकवण्याचा घनिष्ट संबंध होता. कारण जमिनी बळकावण्यातूच ध्वनी प्रदुषणाला चालना मिळत गेली अन् त्यानं आता रौद्ररुप धारण केलं. लेखकानं आपल्या पुस्तकातून अतिक्रमणांचा आणि ध्वनीप्रदुषणाचं नेक्सस कसा असतो? हे अनेक उदाहरणांमधून सविस्तर मांडलं आहे. आपल्याच सोसायटीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणापासून त्यांचा ध्वनी प्रदुषणाविरोधातला लढा खरंतर सुरु झाला आणि एका निर्णायक टप्प्यावर येऊन संपला.

Dr. Yashwant Oak_Vidyanand Bapat
Giorgia Meloni: मोदींसारखाच मेलोनींनी देखील केला विक्रम! पंतप्रधानांनी खास पोस्ट करत केलं अभिनंदन

भारतीय पर्यावरण कायद्यात असह्य होणारा गोंगाट हा केवळ त्रासदायक घटक म्हणूनच दुर्लक्षिला गेला होता. पण याविरोधात डॉ. यशवंत ओक या कृतीशील कार्यकर्त्यानं दिलेल्या मोठ्या कायदेशीर लढ्यामुळं 'नॉईज कन्ट्रोल रुल्स, २०००' हा कायदा भारतात लागू झाला. यामुळं उत्सवी गोंगाटावर निर्बंध आणले गेले, ही दखल घेण्यासारखी गोष्ट असून ज्या प्रत्येकाला गोंगाटाचा त्रास होतो त्याला हे माहिती असणं आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com