Satyajeet Tambe Tweet : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,' ; तांबेंना स्वगृही परतायचं नाही का? ट्विटचा अर्थ काय?

Satyajeet Tambe : ट्विटमधून सत्यजीत तांबेना नेमकं काय सांगायचं आहे?
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe : विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात नुकतेच निर्वाचित झालेले आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता . काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करून, आपण अपक्षच असणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली सविस्तर भूमिका घेतली होती. यानंतर आता सत्यजीत तांबे यांनी सूचक ट्वीट केले आहे. यामुळे आता त्यांच्या ट्वीटची चर्चा होत आहे.

Satyajeet Tambe
Aurangabad Crime News : महिलेची छेड काढणाऱ्या ढुमेंचे निलंबन तर झाले, पण विभागीय चौकशी, दोषारोपपत्राचे काय ?

या दरम्यान काँग्रेसचे दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आजारपणानंतर आता पुन्हा कार्यरत झाले आहेत. त्यांच्या खांद्याच्या दुखापतीतून ते सावरत आहेत. नुकतेच थोरात यांनी तांबेंचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशा आशयाचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. यामध्ये आता तांबे यांनी ट्वीट करताना म्हंटले आहे की,

"उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…

नजरेत सदा नवी दिशा असावी ।

घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…

क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।"

Satyajeet Tambe
Sambhaji Maharaj Memorial News: वढूबुद्रुक आणि तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर; भूमीपूजनही ठरले

या ट्विटनंतर आता सत्यजीत तांबे यांना काँग्रेसमध्ये परतायची इच्छा आहे का? की ते या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आणखी आव्हान देत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे यांनी स्वत:ला आता अपक्ष म्हणून जाहीर केल्यानंतर ट्विटमधून 'उडत्या पाखराला परतीचा तमा नसावी,' अशा शब्दातून आपल्याला काँग्रेसमध्ये परतायची इच्छा नसल्याचा इशारा दिला आहे का? अशी चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com