Sambhaji Maharaj Memorial News: वढूबुद्रुक आणि तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर; भूमीपूजनही ठरले

शिरुर लोकसभा मतदार संघातील वढू-तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा पूर्वीच्या सरकारने २६९ कोटींचा केला होता.
Sambhaji Maharaj Memorial
Sambhaji Maharaj Memorial Sarkarnama

Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : वढुबुद्रुक (ता.शिरूर) व तुळापूर (ता.हवेली) असा एकत्रित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याचे अंतिम सादरीकरण आज (ता.१४) मंत्रीमंडळ बैठकीत झाले. ३८४ कोटींच्या या प्रस्तावित प्रकल्पात आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत वढु बुद्रुक व तुळापूर येथे भव्य भगवे ध्वज उभारण्याच्या कामासाठी अतिरिक्त १३ कोटी रुपयांचीही मंजुरी देण्यात आल्याने हा प्रकल्प आता एकूण ३९७ कोटींचा झाला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण विभागिय आयुक्त सौरभ राव केले असून सदर मंजुर प्रकल्पाचा शुभारंभ १४ मे रोजी धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे दिवशीच करण्याचा निर्णयही यावेळी झाल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली.

Sambhaji Maharaj Memorial
Anil Deshmukh : बावनकुळेंना माझ्या बोलण्याचा संदर्भच समजलेला नाही, म्हणून...

शिरुर लोकसभा मतदार संघातील वढू-तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा पूर्वीच्या सरकारने २६९ कोटींचा केला होता. त्यात काही महत्वपूर्ण बदल, सुधारणा करुन नवीन विकास आराखडा ११५ कोटी वाढवून तब्बल ३८३.५४ कोटींचा बनविण्यात आला. खरे तर हा आराखडा अंतीम मंजुर स्तरावरच होता.

मात्र मंत्रीमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेपुढे तो सादर करण्याचा निर्णय झाला व त्यानुसार आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत सदर आराखडा पुण्याचे विभागिय आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. दरम्यान सुधारीत विकास आराखडा, त्यातील बदल व त्याचे सादरीकरण याबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचेसह सर्वच उपस्थित मंत्री व वरिष्ठ अधिका-यांनी गौरवोद्गार काढल्याचेही श्री आढळराव यांनी सांगितले.

Sambhaji Maharaj Memorial
Kalyan Politics : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजप दावा करणार का?; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितलं...

दरम्यान आपण सदर प्रकल्प प्रारंभ-भूमिपुजन १४ मे रोजी असणा-या धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे दिवशी करावे असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सुचविले होते. त्यानुसारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही १४ मे साठी होकार दिल्याने सदर प्रकल्प शुभारंभ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती रोजी होणार असून पूर्वीच्या सरकारने त्यांचे सरकार पडणार असल्याचे दिसताच २२ जुनच्या दरम्यानच २६९ कोटींचा आराखडा मंजुर केल्याने त्यातील त्रुटींवर काम करुन आणि वढु बुद्रुक व तुळापुर ग्रामस्थांसह शंभूभक्तांच्या सुचनांचा समावेश करुन नवा आराखडा ३९७ कोटींचा झाल्याचे श्री आढळराव यांनी सांगितले.

३८४ कोटींचा एवढा मोठा प्रकल्प आमचे श्रध्दास्थान व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आमच्या गावात होत असल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ व खास करुन कट्टर शंभूभक्त म्हणून प्रचंड आनंदी व समाधानी झालो आहोत. याबाबत आम्ही माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचेशीही नुकतेच बोललो असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री १४ मे रोजी प्रकल्प प्रारंभासाठी वढु बुद्रुक येथे येतील, अशा भावना सरपंच सारीका अंकुश शिवले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Sambhaji Maharaj Memorial
Satyajeet Tambe Tweet : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,' ; तांबेंना स्वगृही परतायचं नाही का? ट्विटचा अर्थ काय?

दोन भव्य भगव्यासाठी १३ कोटींची स्वतंत्र मंजुरी

वढु बुद्र्क व तुळापूर येथे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ६.५० कोटींचा (जीएसटीसह) भव्य भगवा झेंडा कायमचा उभा करण्याच्या कामाचा वरील प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला असून या नवीन कामामुळे आता हा संपूर्ण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा आता ३९७ कोटींचा झाल्याची माहितीही आढळराव-पाटील यांनी यावेळी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याचे शिंदे-फडणवीसांपुढे सादरीकरण करण्यात येणार आहे. १३ कोटी भगवे उभारण्यासाठी नव्याने ३९७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येत्या १४ मे रोजी वढु बुद्रुकमध्ये प्रकल्पाचे भूमिपुजनही निश्चित करण्यात आले असल्याचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com