Nashik Politics : सत्यजीत तांबेंना धक्का; ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

Nashik Politics : ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला
Shumbhagi Patil
Shumbhagi Patil Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुंभागी पाटील (Shumbhagi Patil) यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची आता कोंडी होण्याची शक्यता आहे.

नाशिक पदवीधरची जागेसाठी काँग्रेसचे (Congress) डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला धक्का दिला. तर त्या ठिकाणी त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली.

तसेच आपण काँग्रेसमध्येच असून सर्व पक्षांना पाठिंबा मागणार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले. मात्र, आता काँग्रेसने सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

Shumbhagi Patil
Pune Politics : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवारांनी दिले उत्तर

नाशिक पदवीधर मतदार संघ आता ठाकरे गट लढवणार असल्याचं सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाने नाशिक पदवीधरसाठी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) या निर्णयाला महाविकास आघाडी पाठिंबा देणार का? हा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Shumbhagi Patil
Karnatakaच्या हुबळी येथून आला होता गडकरींच्या कार्यालयात धमकीचा कॉल !

शुभांगी पाटील या आधी भाजपमध्ये होत्या. त्यांनी भाजपचा पाठिंबा आपल्याला मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण भाजपचा (BJP) पाठिंबा सत्यजीत तांबेंना (Satyajit Tambe) मिळणार असं गणित दिसताच शुंभागी पाटील यांनी आज 'मातोश्री'सोबत संपर्क साधला. त्यानंतर ठाकरे गटाने शुंभागी पाटील यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे.

Shumbhagi Patil
Satyajit Tambe News : तांबेंनी खेळलेली खेळी त्यांच्यावरच उलटणार? आघाडीचे ठरले; पाठिंब्याबात भाजपची कोंडी

दरम्यान, आता नाशिक पदवीधर मतदार संघात तीन उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. तसेच शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळताच त्यांनी रणशिंग फुंकले आहे. 'राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com