Solapur: गैरव्यवहाराचा सेतू..! भ्रष्ट गुजरात इन्फोटेक कंपनीला प्रशासनाचा 'आशीर्वाद'

Maharashtra Politics: कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी
Solapur News Setu
Solapur News SetuSarkarnama
Published on
Updated on

Solapur: जनतेच्या सुविधेसाठी महा ई सेवा केंद्र, सेतु कार्यालये राज्यभरात कार्यरत आहेत. मात्र, सुविधा देणारे हे सेतु केंद्र राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासन स्वत: न चालवता खासगी कंपन्यांना याचे टेंडर देते. यापैकी गुजरात इन्फोटेक प्रा लिमिटेड या कंपनीस देखील राज्यातील विविध जिल्ह्यातील टेंडर देण्यात आले आहे. मात्र ही कंपनीकडून सरकारी नियमांना फाटा देत जनतेकडून अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाकडून या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला होता. परंतु सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा याच वादग्रस्त कंपनीला ठेका देण्याचा घाट घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुजरात इन्फोटेक ही कंपनी राज्यातील विविध जिल्ह्यातील सेतू केंद्र चालवत होती. मात्र या कंपनीबद्दल अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालयाने देखील या कंपनीचे टेंडर रद्द करण्याची मागणी केली होती. गुजरात इन्फोटेक या कंपनी विरोधात जनतेमधूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असतानासुद्धा सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा याच कंपनीला जिल्हातील सर्वच सेतू केंद्र चालवण्यास देण्याचा घाट घातला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देत या कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.

Solapur News Setu
Mumbai Congress: अमीन पटेल, अस्लम शेख काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

हेगडे म्हणाले, "मागील अनेक वर्षे गुजरात इन्फोटेक कंपनीच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्हातील सेतू केंद्र चालवली गेली. त्यात बहुतांश सेतू केंद्रावर गैरकारभार झाल्याचे आढळले. याबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्वतः पाहणी केल्यानंतर गैर कारभार आढळून आला. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने केवळ दीड वर्षांतच गुजरात इन्फोटेक या कंपनीचा ठेका रद्द केला. त्याचप्रमाणे 2019 मध्ये ठाणे जिल्ह्यात देखील अशाच प्रकारच्या तक्रारी या कंपनीविरोधात प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी ठाणे जिल्हा प्रशासनाने देखील या कंपनीचा ठेका रद्द केला होता. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 2019 अशाच प्रकारे ठेका रद्द करण्याची कारवाई केली होती. या उपरोक्त सांगली जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चौकशी केली असता एसीबीने देखील या कंपनीवर आक्षेप नोंदवला होता.

राज्यातील इतर जिल्ह्यात गुजरात इन्फोटेक या कंपनीचे कारनामे समोर आल्यावर कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर खुद्द सोलापूर जिल्ह्यात या कंपनीच्या गैरकारभाराचा प्रकार मोहोळ तालुका तहसील कार्यालयाने उघडकीस आणला होता.गुजरात इन्फो या कंपनीने ठेका देताना करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्याबाबत मोहोळ तहसील कार्यालयाने त्या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला होता. अशी सर्व प्रकरणे या कंपनीच्या विरोधात असताना देखील सोलापूर जिल्हा प्रशासनाचा याच कंपनीला ठेका देण्याचा घाट घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून गोर गरिबांचे लूट होत असल्याचे प्रकार जर घडत असतील तर याच कंपनीला ठेका देण्यात अट्टाहास का? असा सवाल तक्रारदार हेगडे यांनी उपस्थित केला आहे.

Solapur News Setu
Mumbai Congress: अमीन पटेल, अस्लम शेख काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

योग्य निर्णय न दिल्यास न्यायालयात जाणार

या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गुजरात इन्फोटेक या कंपनीला ठेका देण्याची प्रक्रिया स्थगित करावी. त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या नव्या आणि नियमात राहून काम करणाऱ्या कंपनीला हे सेतू केंद्र चालवण्यात द्यावे, किंवा जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा उभी करून शासनाच्या मार्फतच हे सुविधा केंद्र चालवावेत अशी मागणी हेगडे त्यांनी केली आहे. प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू समजून काम करायला हवे. मात्र, जर नागरिकांची लूट करणाऱ्या संस्थेच्या मागे प्रशासन उभे राहत असेल तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नसल्याचीही संतप्त भावना सामाजिक कार्यकर्ते हेगडे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सरकारनामाच्या प्रतिनिधींनी फोनवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com