Shahaji Patil: "शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये"; सांगोल्यातील आजी-माजी आमदारांनी डिवचलं!

Sangola News : आगामी काळात आमची आघाडी अभेद्य असल्याचं सांगत शहाजी पाटलांनी राजकीय श्रेय घेण्याचं टाळावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
Deepak Salunkhe_Babasaheb Deshmukh
Deepak Salunkhe_Babasaheb Deshmukh
Published on
Updated on

Sangola News : सांगोला नगरपरिषदेत दोन जागी बिनविरोध निवडी जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडींचे श्रेय घेण्याचा शहाजीबापू पाटील केविलवाणा प्रयत्न करत आहेत, त्यांनी आमची चिंता करू नये अशा शब्दांत सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख अन् माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर सांगोल्यात याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Deepak Salunkhe_Babasaheb Deshmukh
Anand Dave: "कुंभमेळ्यासाठी झाडं तोडता हे कुठलं हिंदुत्व"; आनंद दवेंनी सरकारला पकडलं कोंडीत

देशमुख म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला, शहाजीबापूंना, भाजपचे नेते बाळासाहेब केदार–एरंडे यांसह सर्वांना समन्वय साधण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर सांगोला शहर विकास आघाडीने परिपक्व भूमिका घेतल्यामुळेच बिनविरोध निवडी शक्य झाल्या. पण निवडणुकीपूर्वी शहाजीबापूंनी युतीच्या सर्व मर्यादा सोडून वैयक्तिक टीका केली होती, असा आरोपही या आजी-माजी आमदारांनी केला. निवडणुकीचा निकाल जवळ येताच शहाजीबापूंच्या भूमिकेत अचानक बदल दिसत आहे, ज्यांच्यावर त्यांनी आधी टीका केली त्यांचंच आता ते गुणगान गाण्यात मग्न झाले आहेत,” अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

Deepak Salunkhe_Babasaheb Deshmukh
Andekar in Election: 40 वर्षे गुन्हेगारीत... आंदेकर कुटुंबिय पुन्हा निवडणुकीत...! उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील?

आमची आघाडी तुटणार नाही

“आगामी सर्व निवडणुकांमध्ये आमची आघाडी अभेद्य राहणार आहे. शहाजीबापूंनी आमच्या राजकीय समिकरणांची चिंता करू नये. आज ज्याचा निर्णय घेऊन ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, तोच निर्णय त्यांनी महिनाभर आधी घेतला असता तर सांगोल्यावर निवडणूक लादण्याची वेळ आली नसती. शहराच्या विकासासाठी आम्ही वैयक्तिक राजकीय भूमिका बाजूला ठेवून भाजपसोबत जाण्यास तयार होतो. मात्र, महायुतीत असूनही शहाजीबापूंना भाजपचे एवढं वावडे का? भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मारुती आबा बनकर यांना शहाजीबापूंनी टोकाचा विरोध केला. त्यात शहराचा नव्हे तर स्वतःच्या स्वार्थाचा विचार दिसून आला,” असा आरोप या आमदारांनी केला आहे.

Deepak Salunkhe_Babasaheb Deshmukh
PMC Election: सर्व्हेत भाजपच्या 50 जागा धोक्यात! मित्रपक्षांना विचारात घ्या अन्यथा...; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

शेकाप–साळुंखे एकत्रित लढणार

स्व. गणपतराव देशमुख आणि दिपकआबा साळुंखे यांच्या शांत, सुसंस्कृत विकासच्या परंपरेत पुढे जात शेकाप आणि दिपकआबा यांची आघाडी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत एकत्र राहणार असल्याचंही यावेळी दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com