Shahajibapu Patil : काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजीबापूंचा 'हा' आहे नवा संकल्प!

Shahajibapu Patil : बापूंनी पक्क ठरवलं, यापुढे सांगोल्यात..
Shahajibapu Patil
Shahajibapu Patil Sarkarnama

Shahajibapu Patil : सांगोला तालुक्यामध्ये विविध योजनांमधून शेतीला पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे पाणी प्रश्नावर यापुढे आंदोलनाची वेळच येणार नाही. तालुक्यामध्ये प्रलंबित व प्रस्तावित कामांना पैशांची कमी पडणार नाही. सांगोला तालुक्यावर पडलेला 'दुष्काळी तालुका' हा कलंक कायमचा पुसून काढायचा आहे, असा ठाम निर्धार सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी पाटील यांनी केला. (Latest Marathi News)

"आमदार आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार (ता. २०) रोजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील या आजी माजी आमदारांनी तालुक्यातील नराळे, डिकसळ, पारे, हंगीरगे, घेरडी, वाणीचिंचाळे, वाकी घे, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव आणि राजापूर गावातील नागरिकांशी संपर्क साधला.

सकाळी १० वाजता सुरू झालेला "आमदार आपल्या दारी" हा कार्यक्रम रात्री १० पर्यंत सुरू होता. या दौऱ्यात भाऊसाहेब रुपनर, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महावितरणचे उपअभियंता आनंद पवार आदीसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी या उपक्रमास तालुक्यातील ११ गावांना भेटी दिल्या.

Shahajibapu Patil
Shinde vs Thackeray : धनुष्यबाणाचा निर्णय आज होणार की राखून ठेवणार?

शहाजीबापू पुढे म्हणाले की,'शेतीसाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना, जीहे काठापूर आदी योजनेतून पाणी मिळते. तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीक्षेत्र या योजनांद्वारे ओलिताखाली येते मात्र, तालुक्यातील ज्या भागांना पाणी उपलब्ध होत नाही, त्या सर्व गावांना म्हैसाळ सिंचन योजनेच्या विस्तारामध्ये समावेश होणार आहे, यामुळे त्यांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळीमाजी आमदार दीपक साळुंखे पाटील म्हणाले की, "तालुक्यातील प्रलंबित राहिलेले विकासकामे मार्गी लावत असताना विकासाच्या कामांमध्ये कोणतेही राजकारण न करता संपूर्ण तालुक्याचा सर्वसमावेशक विकास करण्याचे स्वप्न आमदार शहाजीबापू आणि मी पूर्ण करत आहोत. तालुक्यातील तळागाळात राहणारा सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून नराळेपासून इटकीपर्यंत आणि जुनोनीपासून देवळेपर्यंत तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित ठेवणार नाही."

Shahajibapu Patil
Beed : फडणवीसांच्या सभेला मुंडे भगिनी का होत्या गैरहजर? स्वत: पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील विविध राजकीय व सामाजिक कार्यक्रमांना एकत्रितच असतात. "आमदार आपल्या दारी" या माध्यमातूनही हे दोन आजी-माजी आमदार प्रत्येक गावात नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करीत असताना दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com