Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Beed : फडणवीसांच्या सभेला मुंडे भगिनी का होत्या गैरहजर? स्वत: पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

Pankaja Munde : ''आपण भाजपच्या संस्कारात व मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता...''
Published on

Pankaja Munde : ''आपण भाजपच्या संस्कारात व मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाचा व संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. पण, कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमाला जाणे मला कंपल्सरी नाही'', असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांचे मागील पंधरवाड्यात जिल्ह्यात दोन झाले. या दौऱ्यांत मुंडे भगनींच्या अनुपस्थितीवरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २०) प्रतिक्रीया दिली आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) शुक्रवारी जिल्ह्यात होते. यावेळी पंकजा मुंड, खासदार डॉ. प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या. गेवराईतील मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Pankaja Munde
Old pension : योजना नाकारण्याची भाजप नेतृत्वाची स्पष्ट भूमिका गाणारांसाठी धोक्याची ठरणार?

पंकजा मुंडे म्हणाल्या, ''प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे, त्यांना मी ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे''. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचे कारण काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, ''मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल'', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

त्या पुढे म्हणाल्या, ''माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे अशा बातम्या चुकीच्या आहेत. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले म्हणून मी आले.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) आले होते तेव्हाही मी आले. मी भाजपच्या संस्कारात, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा, संघटनेचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला जाणे मला कंपल्सरी नाही'', असं त्या यावेळी म्हणाल्या.

Pankaja Munde
Solapur News : एक पुरावा जरी दिला तर कोणत्याही शिक्षेस तयार : शिंदे गटाच्या काळजेंचे आव्हान!

दरम्यान, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमांना हमखास हजर असणाऱ्या पंकजा मुंडेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळे फडणवीस-मुंडे यांच्यातील नाराजीची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्या याबाबत सविस्तर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com