Shambhuraj Desai News : शंभूराज देसाईंची तत्परता, प्रचारात व्यस्त असूनही मतदारसंघातील नुकसानीची केली पाहणी...

Satara Loksabha constituency: शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे धाव घेतली. पालकमंत्री देसाईंच्या या समय सुचकतेची सध्या पाटण मतदारसंघात चर्चा रंगली आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSatara Loksabha

कृष्णत साळुंखे

Patan News : पाटण विधानसभा मतदारसंघात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे विशेष विमानाने मतदारसंघात आले. त्यांनी नुकसानीची पाहणीकरून तातडीने पंचनामे करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे (Shirdi Loksabha Constituency) धाव घेतली. पालकमंत्री देसाईंच्या या समय सुचकतेची सध्या पाटण मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

सध्या राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची लगभग सुरू आहे. राज्यातील विविध राजकीय नेते आणि सरकारमधील पालकमंत्र्यांवर विविध जिल्ह्यातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ही सातारा, सांगली आणि हातकणंगले या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावताच मंत्री देसाई यांच्यासह सातारा, सांगली, हातकणंगले या तिन्ही जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार यांच्यावर शिर्डी आणि संभाजीनगर येथील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.

Shambhuraj Desai
Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा

येथील प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त असतानाच अवकाळी पावसामुळे पाटण मतदारसंघात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील अनेक घरांचे, शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पालकमंत्री देसाई (Shambhuraj Desai) यांना शिर्डी आणि संभाजीनगरच्या प्रचार दरम्यान मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी कसलाही विचार न करता तातडीने विशेष विमानाने आपला मतदारसंघ गाठला. Satara Guardian Minister

आपल्या पाटण विधानसभा (Patan Vidhansabha) मतदारसंघात येऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत करण्याविषयी कार्यकर्ते, तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे तेवढ्याच तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ही दिले. दरम्यान, पक्षाचा आदेश येताच पुन्हा ते ठाण्याकडे विशेष विमानाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेसाठी रवाना झाले.आपल्या मतदारसंघातील सामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून येऊन पालकाचे कर्तव्य जपून खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांनी पालकत्व जपल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

Shambhuraj Desai
Swati Maliwal News : अखेर ‘आप’ची कबुली; स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या PA वर होणार कारवाई  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com