Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा

Loksabha Election 2024 : पालघरची निवडणूक बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. अखेरच्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा
Sarkarnama

Palghar Loksabha Election : लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्पात पोहोचली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. पालघरची निवडणूक बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. अखेरच्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

यातच आता चौथ्या टप्प्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे. या मतदारसंघाचे मतदान 20 मे रोजी होत आहे. निवडणूक प्रचारासाठी आता फक्त सहा दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. अखेरच्या टप्प्यात पालघर विधानसभा क्षेत्रात उमेदवार आणि नेत्यांनी मोठ्या सभा, चौक सभा, कॉर्नर सभा तसेच रॅली काढून प्रचाराचा धडाका उडवला आहे.

सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पालघरमधील विविध भागत रोज हजेरी लावत आहेत. महायुतीकडून अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पालघरमध्ये सभा घेतली आहे. ही लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा
Chhatrapati Sambhajinagar Constituency : मुस्लिम मतांचा टक्का वाढला, तरी एमआयएमच्या 'पतंगा'ला ढील नाहीच..!

या निवडणुकीत ठरणार हे महत्त्वाचे मुद्दे

मतदारसंघातील शहरी भागात पर्यावरणाचा प्रश्न, वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्था, औद्योगिकरण, रेल्वे मार्गाची संख्या वाढवणे, कामगारांचे प्रश्न ह्या शहरी भागातील प्रश्न आणि समस्या आहेत.

तर आदिवासी ग्रामीण भागात पाण्याची समस्या, रोजगार, स्थलांतर, कुपोषण, माता आणि बालमृत्यू तसेच आरोग्य व्यवस्थेची समस्या आजही कायम आहेत. या समस्या सोडविण्याचे आव्हान खासदारांसमोर असणार आहे.

आता निवडणूक प्रचारा दरम्यान उमेदवार या मुद्द्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेले विकासाचे व्हिजन महायुतीतील प्रचारक मतदारांसमोर मांडत आहेत. आता मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बड्या नेते मंडळींच्या सभा मतदारसंघात होणार आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघातील, विधानसभा क्षेत्र निहाय मतदार

  1. डहाणू   -     2  लाख  83   हजार  419.

  2. विक्रमगड -  3  लाख   1  हजार   964.

  3. पालघर  -    2  लाख  82   हजार  686.

  4. बोईसर  -    3   लाख   84  हजार   233.

  5. नालासोपारा  - 5  लाख  57  हजार  671.

  6. वसई   -      3   लाख   38  हजार  541.

पालघर लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार संख्या -  21 लाख  48 हजार 514. 

Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा
Sanjay Raut: ...तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं मोठं वक्तव्य

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com