Udayanraje Bhosale: उदयनराजेंची शरद पवारांसाठी खास पोस्ट; चर्चा लोकसभेची!

Sharad Pawar Birthday News: अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला असून तेथून राजेंना संधी दिली जाणार नाही, हे निश्चित आहे.
Sharad Pawar, Udayanraje Bhosale,
Sharad Pawar, Udayanraje Bhosale, Sarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील

Satara News: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात असलेले राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्ट करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

साताऱ्यातील सध्याची राजकीय परिस्थितीत उदयनराजेंच्या या शुभेच्छा लक्ष वेधून घेत आहेत. उदयनराजे यांनी साहेब आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा असे पोस्टमध्ये म्हटले असून अनेकजण त्यावर आपल्या कमेंट करत आहेत. आज (मंगळवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने अनेकजण शुभेच्छा देत असले तरी उदयनराजेंच्या पोस्टमुळे लोकसभा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.  

सातारा जिल्ह्यात 2009 आणि 2014 साली उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार झाले होते. त्यानंतर 2019 मध्येही निवडून आले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देत पोटनिवडणूकीत भाजपाच्या तिकिटावर पराभूत झाले होते. या घडामोडीमुळे उदयनराजे यांना राज्यसभेवर भाजपाने घेतले असले तरी मंत्रीपदाची हुलकावणी आजही दिली जात आहे. आता आगामी लोकसभा निवडणूकीतही उदयनराजे यांना पर्याय शोधण्याचे काम भाजपाकडून सुरू असल्याने अनेकदा भाजपाच्या राजकीय कार्यक्रमांना उदयनराजे गैरहजर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला असून तेथून राजेंना संधी दिली जाणार नाही, हे निश्चित आहे. 

Sharad Pawar, Udayanraje Bhosale,
Anand Niragude Resign : आरक्षणावर चर्चा होण्यापूर्वीच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांचा राजीनामा

उदयनराजेंबाबत शरद पवार म्हणाले...

सातारा लोकसभा मतदार संघावर शरद पवार गटानेही आपला दावा केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाबाबत आणि लोकसभा तिकिटाबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. उदयनराजे भोसले यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षात घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी तुमच्याकडे काही माहिती दिली आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला. उदयनराजे यांचं भाजपमध्ये मन लागत नाही, म्हणून विचारलं की तुमच्याशी त्यांची पुन्हा जवळीक झाली आहे का? असं विचारलं. तेव्हा मन लागत नाही. तर कुठे कुठे मन लागत नाही, याची खासगीत माहिती मला द्या…असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर शरद पवार स्वत: देखील खळखळून हसले आणि उपस्थितांमध्येही हास्याचा फवारा उडाला. पत्रकार परिषद सुरु असलेल्या सभागृहात एकच हशा पिकला.

शरद पवारांसाठी खास पोस्ट

भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्ट केली असून त्यामध्ये पद्मविभूषण, मा. केंद्रीय कृषी मंत्री, भारत सरकार, खासदार मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे म्हटले आहे.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale,
Rajasthan CM News: राजस्थानचा मुख्यमंत्री आज ठरणार; मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच भाजप धक्कातंत्र वापरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com