Rajasthan Election 2023 : सत्ता परिवर्तनाची परंपरा राजस्थानमध्ये अबाधित राहिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून महंत बालकनाथ यांना पसंती मिळत असली तरी अन्य काही नावांचा विचार केल्याशिवाय पक्षश्रेष्ठींना निर्णय घेता येणार नाही. मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावर आज फैसला होणार आहे.
छत्तीसगढ, मध्य प्रदेश मध्ये भाजपने मुख्यमंत्री पदासाठी ज्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला, तसेच धक्कातंत्र राजस्थान मध्ये वापरणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. वसुंधरा राजे, योगी बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, दिया कुमारी यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले तरीही मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे या पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आज जयपूरच्या भाजप मुख्यालयात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. काल (सोमवार) बैठक रद्द झाली आहे.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी कुठल्याही नेत्याला न भेटण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहे. पण रविवारी अनेक आमदारांनी वसुंधरा राजे व प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला समर्थन द्यावे, त्यासाठी काही नेते आमदारांनी फोन करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
वसुंधरा राजे यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. रविवारी रात्री वसुंधरा राजेंनी बारा आमदारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री पदासाठी पक्षश्रेष्ठी आमदारांच्या मताला महत्व देणार असल्याचे समजते.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, बाबा बालक नाथ यांना भाजपचा सर्वात आवडता चेहरा घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याबाबत बालकनाथ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे."आपण पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करतो. याशिवाय आम्हाला काहीही माहिती नाही. आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपण सेवा करीत आहोत," असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.