शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला : ...त्यांना महाराष्ट्र समजलाच नाही !

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असले तरी तिथले गृहखाते भाजपच्या हातात आहे. गृहमंत्री अमित शहा आहेत. गृह खात्याची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी राजधानी एकसंघ राहील, याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली नाही.
Sharad Pawar | Raj Thackeray
Sharad Pawar | Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर ः शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव भाषणात का घेता? असा सवाल मला विचारणाऱ्यांना महाराष्ट्रच समजलेला नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता आपल्या खास शैलीत निशाणा साधला. (Sharad Pawar criticizes Raj Thackeray without naming him)

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता आज येथील तपोवन मैदानावर मोठ्या जाहीर सभेने झाली. पवार म्हणाले की, २०१४ ची निवडणूक वेगळी झाली आणि भाजपच्या हातात देशाची सत्ता गेली. लोकांचा कौल होता, सत्ता हातात आल्यानंतर त्याचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता राहील, देश एकसंघ राहील, समाजाचे सगळे घटक एका विचाराने कसे राहतील? यासाठी होईल असे वाटले होते. किंबहुना ही सरकारची जबाबदारीच असते. पण आज चित्र वेगळे दिसते. माणसा-माणसांत अंतर वाढत आहे. गेले काही दिवस देशाची राजधानी दिल्लीत संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी जाळपोळ झाली. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असले तरी तिथले गृहखाते भाजपच्या हातात आहे. गृहमंत्री अमित शहा आहेत. गृह खात्याची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी राजधानी एकसंघ राहील, याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली नाही.’’

Sharad Pawar | Raj Thackeray
कोल्हापूरचा निकाल...चंद्रकांतदादांची घोषणा...जयंतरावांचे विधान अन्‌ शरद पवारांची काळजी!

दिल्लीत जे काही घडते त्याचा संदेश जगात जातो. या घटनेवरून चुकीचा संदेश जगभर गेला आहे आणि हा संदेश देणारे लोक देशात सत्ताधारी आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ‘जिथे जिथे भाजपची सत्ता, त्याठिकाणची ही अवस्था आहे. एक प्रकारची आव्हानाची स्थिती देशात आहे. म्हणून कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वांनी जो उमेदवार पुढे केला, त्याला मोठ्या मतांनी विजयी केले. तुमच्या सगळ्यांच्या या उत्तम भूमिकेचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी उत्तम काम करत आघाडीचा धर्म पाळण्याची काळजी घेतली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे; पण मत मागताना, कुणी तरी सिनेमा काढला, तोही काश्‍मीर विषयावर. दहशतवाद्यांनी त्याठिकाणी राहणाऱ्या पंडितांवर हल्ले केले, त्या वर्गाला देशाच्या अन्य भागात यावे लागले. ती फिल्म याठिकाणी दाखविण्यात आली. यामागे जातीय संघर्ष व्हावा, त्यातून मतांचा जोगवा मागता यावा, हा डाव होता; पण कोल्हापूरच्या सूज्ञ लोकांनी त्यांना धडा शिकवला.’’

Sharad Pawar | Raj Thackeray
सर्वांचा डीएनए एक; मग मागासांच्या आरक्षणाला विरोध का? : जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

ते म्हणाले, ‘‘ कोल्हापूर उत्तरचा जो काही निकाल लागला, तो अतिशय चांगला लावला. कोल्हापूरपुरता हा संदेश मर्यादित न ठेवता महाराष्ट्राबाहेर तो न्या. भारत हा असा देश आहे की इथे जगातील नेते येतात. यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातही जगभरातील नेते भारतात आले; पण त्यांची पहिली भेट ही दिल्लीत ठरलेली असायची. तेथून ते मुंबई, हैदराबाद बंगळूरला भेट द्यायचे; पण अलीकडे काय दिसते? परदेशी पाहुणे आले की त्यांना गुजरातला नेले जाते. आम्हाला गुजरातविषयी असूया नाही; पण हा संकुचित विचार देशाच्या हिताचा नाही. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते, त्याचा गैरवापर करायचा नसतो; पण गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात काय सुरू आहे? ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सन्मानाने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे.’’

Sharad Pawar | Raj Thackeray
पोलिस घरात पोचताच नवनीत राणांची फडणवीस, राणेंना मदतीसाठी विनंती

अनेक जण माझ्यावर टीका करतात. मी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही? अशी टीका झाली; पण शिवाजी महाराज तर आमच्या अंतःकरणात आहेत. शिवाजी महाराज हा आगळावेगळा राजा होऊन गेला. अठरा पगड जातींना एकत्र करून राज्यनिर्मितीचे ऐतिहासिक काम कोणी केले असेल तर ते शिवाजी महाराज यांनी केले. या देशात अनेकांची राज्ये येऊन गेली; पण ३००-४०० वर्षांनंतर कोणाची आठवण येत असेल तर एकच उत्तर येते शिवाजी महाराज. त्यांनी राज्य केले, ते भोसल्यांचे नव्हते, ते रयतेचे होते, हिंदवी स्वराज्याचे होते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणणाऱ्यांना हा महाराष्ट्र समजलाच नाही, असा टोला पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com