कोल्हापूर : कोल्हापुरातील राष्ट्रवादी (ncp) परिवार संवाद यात्रेच्या समारोपाच्या सभेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की भाजपच्या पराभवानंतर आमदार पाटील यांनी हिमालयात जाईन, असे सांगितले होते. कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि माझी काळजी वाढली. कारण, चंद्रकांत पाटील हिमालयात जायला निघाले तर आमचे जयंतरावही (jayant Patil) त्यांच्याबरोबर निघाले. हा किस्सा सांगून पवारांनी चंद्रकांतदादांच्या घोषणेची खिल्ली उडवली. (Sharad Pawar criticizes Chandrakant Patil in Kolhapur Rally)
कोल्हापुरात सभेच्या अध्यक्षीय भाषणात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी पराभव झाला तर हिमालयात जाईन, अशी घोषणा केली होती. तुम्ही कोल्हापूकर हुशार. त्यांची अवस्था बघून त्यांचा तुम्ही बंदोबस्त केला. ते बरेच दिवस संघाच्या शाखेवर गेले होते, असे आम्ही ऐकून होतो. तसेच, शब्दाला पक्का असल्याचे ते नेहमी सांगतात. त्यामुळे येथे जी त्यांनी घोषणा केली. त्यानंतर जो निकाल लागला आणि माझी काळजी वाढली. त्याचे कारण असं की, चंद्रकांत पाटील हे हिमालयात जायला निघाले, तर ते नक्कीच तेथे जातात की नाही, हे पाहण्यासाठी जयंतराव त्यांच्या पाठीशी निघाले. माझ्या वाचनात आलं की जयंत पाटील हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जाणार आहेत. त्यानंतर मी चौकशी केली की, ‘तुम्ही कशाला जाता. तेव्हा जयंत पाटील यांनी मला सांगितले की चंद्रकांत पाटील हे नक्कीच हिमालयात जातात की काय हे पाहण्यासाठी मी जाणार हेातो. ते हिमालयात गेले आणि त्या ठिकाणी बसले की मी शांतपणाने परत येईन.
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचा जो काही निकाल लावला, ते कोल्हापूरच्या जनतेने अतिशय चांगला लावला. हा निकाला कोल्हापूरपुरता सिमित नव्हता, तो संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर गेला. त्यामुळे मी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानतो, त्यांनी महाआघाडीच्या उमेदवाराला विजयी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडीचा शब्द पाळून काम केले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन, असेही शरद पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या दरम्यान कोल्हापुरात ‘काश्मीर फाईल’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यातून समाजात फूट पाडायची आणि मताचा जोगावा मागायचा, हे भाजपच्या लोकांनी कोल्हापुरात केले. अनेकांना माहिती नाही की, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा देशात भाजपच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रतापसिंग हे पंतप्रधान होते. पण, कोल्हापूरच्या जनतेने भाजपचा भ्रम दूर केला आहे. जिथ जिथं भाजपची सत्ता आहे, तिथ तिथं विद्वेषाची बिजे रोवली जात आहेत. कर्नाटकात भाजपकडून हा प्रकार केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.