Prajakt Tanpure News : लोकसभेसाठी नाव सुचवलंय, पण मी...; शरद पवार गटाचे आमदार तनपुरेंचं मोठं विधान

Prajakt Tanpure On Lok sabha Election : शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण आता त्यांच्या गटाचे आमदार प्रजक्त तनपुरे यांनी मोठं विधान केलं आहे.
sharad pawar, prajakt tanpure
sharad pawar, prajakt tanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News : "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार सांगतील तोच उमेदवार असेल व मतदारही पवारांकडे पाहूनच मतदान करतील, असा दावा करत माझे नाव सुचवले असले तरी मला राहुरी विधानसभा मतदारसंघातच काम करायचे आहे", अशी माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती तनपुरे यांनी माध्यमांना दिली.

sharad pawar, prajakt tanpure
Nagar Loksabha Election : नगर दक्षिणेतून राम शिंदेही लोकसभेच्या रिंगणात ?

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून रोहित पवार व माझे नाव उमेदवारीसाठी सुचवले गेले आहे, पण राहुरी विधानसभा लढण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. मंत्रिपदी काम केल्याचा अनुभव असल्याने अधिक विकासात्मक काम राज्यात आणि नगरमध्ये करता येईल". मात्र, पक्ष संघटनेचे जे मत आणि शरद पवार यांचा जो आदेश असेल, त्याचा आदर राहणार असल्याचेही आमदार तनपुरे यांनी आवर्जून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या चर्चेत रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र फाळके व अन्य काही नावे या वेळी सुचवली गेली. त्यावर अंतिम निर्णय काही झाला नाही. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे नाव काही कार्यकर्त्यांनी सुचवले आहे. परंतु त्यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांची सत्तेसमवेत राहायचे की शरद पवारांबरोबर राहायचे, असा संभ्रम त्यांच्यात आहे. त्यामुळे अशा सर्वांना दसऱ्यापर्यंत मुदत देऊन तोपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

आमदार तनपुरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबतही या वेळी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, "मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेत पक्षाचे चार आमदार होते. आता दोन जण अजित पवार गटाबरोबर आहेत, तर भाजपचे दोन जण विरोधात आहेत. परंतु शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती व त्यांना मानणारा मोठा वर्ग, यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळेल". नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही मित्र पक्षाला सोडला जाणार नाही. राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार लोकसभेसह प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहेत, असेही तनपुरे यांनी सांगितले. शरद पवारांच्या आढावा बैठकीत बाहेरच्या अन्य पक्षातील कोणत्याही नावाबद्दल चर्चा झाली नाही, असे तनपुरे यांनी सांगितले.

खासदार सुजय विखेंवर टीका

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवल्याचे कधी पाहिले नसल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. कांदा निर्यात शुल्क, शेतमालाचे पडलेले भावावर ते कधीही बोलले नाही. भाजपची शेतकरीविरोधी भूमिका यातून स्पष्ट होते. तसेच दक्षिणेतील राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अधिकारी पैसे खात आहेत, सत्ताधारी फोडाफोडीत मग्न असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

sharad pawar, prajakt tanpure
Kolhapur Politics : 'कोल्हापूर' राष्ट्रवादी सोडणार, 'हातकणंगले' धरणार? लोकसभेसाठी निष्ठावंतांचा लागणार कस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com