Nagar Loksabha Election : नगर दक्षिणेतून राम शिंदेही लोकसभेच्या रिंगणात ?

BJP Politics : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत.
Nagar Loksabha Election :
Nagar Loksabha Election :Sarkarnama

Nagar Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगर उत्तर दौरा निश्चित झाला असून, 26 ऑक्टोबरला शिर्डीत येत आहेत. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे हे या दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त आहेत. हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकांची दिशा ठरणारा आहे. अशातच नगर जिल्ह्यातील भाजपअंतर्गत असलेला वाद धुमसायला सुरुवात झाली आहे. लोकसभेसाठी नगर दक्षिणमधून आमदार प्रा. राम शिंदे यांनी इच्छुक असल्याचे जाहीरपणे सांगायला सुरुवात केली आहे.

आमदार शिंदे हे फक्त सांगून शांत बसलेले नाहीत, तर त्यांनी नगर दक्षिण मतदारसंघातील सर्व पक्षीय जुन्या-जाणत्या मित्रांना संपर्कदेखील सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी संपर्क अभियान अधिकच तीव्र केले आहे. नगर दक्षिणेमधून आमदार शिंदे हे भाजपकडून संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Nagar Loksabha Election :
Shivsena Effect: शिवसेनेला उत्तर देण्यासाठी ३ आमदारांसह अख्खी भाजप एकवटली!

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. याच लोकसभा मतदारसंघावर आमदार प्रा. राम शिंदे यांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीची सत्ता उलटल्यानंतर भाजपने शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट बरोबर घेऊन महायुतीची सत्ता स्थापन केली. यात राधाकृष्ण विखेंना मंत्रिमंडळात महसूल याचबरोबर नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या प्रा. राम शिंदे यांना पुढे विधान परिषदेवर संधी मिळाली. विखे-शिंदे यांचा भाजपमधील संघर्ष कोणापासून लपून राहिलेला नाही. तो वेळोवेळी पुढे आलेला आहे आणि वाढत आहे. मंत्री विखे हे राज्यापेक्षा केंद्रात वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्क ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी वेगवेगळ्या कारणातून संपर्क वाढवतच आहेत. विखे यांचे केंद्रात वाढते वजन राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान ठरत आहे.

Nagar Loksabha Election :
Shivsena Effect: शिवसेनेला उत्तर देण्यासाठी ३ आमदारांसह अख्खी भाजप एकवटली!

नगरमध्ये भाजपअंतर्गत काम करताना विखे-शिंदे संघर्ष वरिष्ठांपासूनदेखील सुटलेला नाही. या संघर्षाला राज्यातील नेतेदेखील काहीअंशी हवा देत असतात. आता आमदार शिंदे यांनी लोकसभा 2014 आणि 2019 मध्ये विचारणा झाली होती. तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले होते, पण आता लोकसभेसाठी इच्छुक आहे. वरिष्ठ नेत्यांना तसे आमदार शिंदे यांनी कळवले आहे. आमदार शिंदे हे आता लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीरपणे बोलू लागले आहेत. ते बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी नगर दक्षिणेमध्ये त्यांच्या जुन्या-जाणत्या मित्रांना संपर्क सुरू केला आहे.

पाथर्डी श्री क्षेत्र मोहटा देवी दर्शनाला जाताना राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याबरोबर एकाच वाहनात गेले होते. देव दर्शनानंतर या दोघांमध्ये बराच राजकीय खल झाला. यानंतर आमदार शिंदे यांनी वेगाने नगर दक्षिणमध्ये संपर्क अभियान सुरू केला आहे. आमदार शिंदे स्वतःच्या मोबाईलवरून थेट संपर्क करत आहेत. या संपर्कामध्ये सर्वच पक्षांतील पदाधिकारी आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. हे संपर्क अभियान पुढे तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

आमदार शिंदे नगर दक्षिणमध्ये वाढवत असलेल्या संपर्काची दखल विखे पिता-पुत्र हे घेणार नाही, असे होणार आहे. सध्या आमदार शिंदे करत असलेल्या संपर्कावर विखे लक्ष ठेवून आहेत. आमदार शिंदे यांच्या या संपर्कावर विखे पिता-पुत्र काय भूमिका घेतात किंवा वरिष्ठांसमोर काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Nagar Loksabha Election :
Operation Lotus : कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्‌स’; भाजपकडून काँग्रेस आमदारांना मोठ्या ऑफर, ‘डीकें’ची कबुली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com