Sharad Pawar News : पैसा अन् जातीचा वापर सत्तेच्या राजकारणासाठी होतोय, हे बदलायचं तर.. ; पवारांचे आवाहन...

Ncp News : "लहानशा गावातही 'खोकेवाले', 'गद्दार' शब्द वापरला जात आहे.."
Sharad Pawar News :
Sharad Pawar News :Sarkarnama

Sharad Pawar News : सत्तेचा वापर सर्वसमावेशक व लहान घटकांसाठी केला गेला पाहिजे. परंतु आजकाल अशा लहान घटकांसाठी सत्तेचा वापर होताना दिसत नाही. आज पैसा, जातीचा वापर सत्तेच्या राजकारणासाठी केला जात असून, हे राजकारण सामान्य माणसाच्या हातात आणायचे असेल तर महाविकास आघाडीला सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी केले.

Sharad Pawar News :
Pune News : चंद्रकांतदादा आले अन् अजितदादांचे व्यंगचित्र शोधू लागले; दादांची भन्नाट मिश्किली..

सांगोला येथे लोणारी समाजाच्या वतीने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार रामहरी रुपनर, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, नागेश फाटे, रामहरी रुपनर, बाबा कारंडे, पी. सी. झपके, संजय पाटील, जयमाला गायकवाड, लतिफ तांबोळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Sharad Pawar News :
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची आमदारकी गेली तरी मुख्यमंत्रीपदावर तेच राहू शकतात? राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य

याप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या पोटनिवडणुकीने राज्यात इतिहास निर्माण केला आहे. कर्तुत्व असेल, लोकांशी बांधिलकी असली की लोक निश्चितपणे प्रेम करतात हेच या निवडणुकीतून दिसून आले आहे. आज ग्रामीण भागातील लहानशा गावातही 'खोकेवाले', 'गद्दार' शब्द वापरला जात आहे हे खोकेवाले सरकार सामान्याच्या पचनी पडले नाही. या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, सामान्य माणसाच्या हातात राजकारण आणायचे असेल तर महाविकास आघाडीला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे.

Sharad Pawar News :
DRDO News : 'रॉ'च्या तपासात धक्कादायक बाबी? ; कुरूलकरांनी पाकीस्तानला माहिती पुरवली!

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, "सध्याच्या सरकारला जनसामान्यांचे कोणतेही देणे घेणे नाही. हे ईडीचे सरकार आहे. सध्याच्या गद्दार सरकारामुळे त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. जनतेच्या हिताचे सरकार आणायचे असेल तर सर्वांना एकत्रित काम करावे लागणार आहे. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, अनिल नवत्रे, दीपक साळुंखे - पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक बाबा कारंडे यांनी केले. पी. सी. झपके यांनी आभार मानले.

Sharad Pawar News :
Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

पवारांचे सारथ्य पुन्हा दीपक साळुंखे यांच्याकडे -

पंढरपूरचा कार्यक्रम करून शरद पवार यांचे सांगोला रस्त्यावरील हायवे ब्रिज जवळ माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी स्वागत केले. स्वागतानंतर लगेचच शरद पवार यांच्या गाडी चालवण्यासाठी दीपक साळुंखे - पाटील बसले. या अगोदरही सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांचा कार्यक्रम असला की, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत साळुंखे - पाटीलच सारथ्य नेहमी करीत असतात. आजच्या कार्यक्रमातही तोच प्रत्यय आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com