Sharad Pawar, Babanrao Shinde
Sharad Pawar, Babanrao Shinde Sarkarnama

Madha Politics : माढ्यातील पवारांच्या सभेला आमदार शिंदेंच्या विरोधकांची रसद! राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

Sharad Pawar Sabha Manegaon Madha Solapur : शरद पवारांच्या सभेपूर्वीच माढ्यातील राजकारण तापलं आहे. आमदार बबनराव शिंदेंना घेरण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे...
Published on

हर्षल बागल

Solapur Politics News : माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मानेगाव येथे 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. द्राक्ष बागायतदारांच्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शक म्हणून येत आहेत. या सभेला अजित पवारांच्या बाजूने गेलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे पारंपरिक विरोधक रसद पुरवत असल्याची खमंग चर्चा सध्या माढ्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे आमदार बबनदादांच्या विरोधात पवारांपासून ते विधानसभा मतदारसंघातील विरोधकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar, Babanrao Shinde
NCP Split News : शरद पवार-अजितदादांबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा दावा; सर्वच बुचकळ्यात!

मागील 23 ऑक्टोबर रोजी पवारांचा दौरा निश्चित केला गेला होता, परंतु मराठा आरक्षण आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शरद पवार यांनी सदरचा दौरा हा रद्द केला होता. त्याच दिवशी बबनराव शिंदे यांच्या कारखान्याच्या मोळीपूजनसाठी अजित पवारांनाही निमंत्रण दिले होते. अजित पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती. ऊसपट्ट्याच्या माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवारांसह शरद पवारांनीही फळबागांवर लक्ष घातलेलं आहे.

16 नोव्हेंबर रोजी होणारी सभा ही मानेगाव येथे होणार असून, मानेगाव हे बार्शी, माढा आणि मोहोळ या तीन तालुक्यांच्या सीमेवर मध्यवर्ती असलेले गाव आहे. द्राक्ष बागायतदार आणि ऊसपट्ट्याचा परिसर म्हणून या गावाला ओळखलं जातं. याच परिसरामध्ये कृषिनिष्ठ परिवार यांच्या वतीने नितीन कापसे यांनी या शरद पवारांच्या सभेचे आयोजन केलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीन कापसे हे शेतकरी असून, त्यांना पडद्याआडून अनेकांनी मदत केल्याचे तालुक्यांमध्ये चर्चिले गेले आहे. शरद पवारांच्या सभेचा अंदाजे खर्च हा तब्बल 15 ते 20 लाख रुपये वर्तवला जात आहे. या खर्चाला आमदार बबनराव शिंदे यांचे पारंपरिक अनेक विरोधक हे आतून मदत करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांना विरोध करताना त्यांचे विरोधक एकही संधी सोडायला तयार नसल्याचे या ठिकाणी दिसत आहे.

शरद पवारांचे एकनिष्ठ आमदार म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांची ओळख होती, परंतु ईडी अस्रामुळे कदाचित आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवारांसोबत भाजपच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आमदार शिंदे सोबत त्यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदेदेखील हे अजित पवारांच्या पाठीमागे गेलेले आहेत. पवारांना सोडचिठ्ठी दिल्यामुळे पवारांनी माढा विधानसभेवरती लक्ष दिलेले आहे.

माढा मतदारसंघात खुद्द शरद पवारांचे विशेष लक्ष

माढा विधानसभा मतदारसंघात हा आमदारकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यासोबतच माढा हा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघात खुद्द पवारांनी विशेष असं लक्ष दिले आहे. कारण माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असताना मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर रणजीत निंबाळकर यांना निवडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका भाजप पक्षाच्या वतीने राबवली आहे. त्यामुळे पवारांना सोडलेल्या आमदार बबनरावांची कोंडी करण्यासाठी विरोधक एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आगामी काळात बबनराव शिंदे यांचे विरोधक अकलूजचे मोहिते पाटिल यांचीदेखील भूमिका टर्निंग पॉइंट असू शकते.

Sharad Pawar, Babanrao Shinde
Bhausaheb wakchoure : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शेती, वीजप्रश्नी आक्रमक; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com