NCP Split News : शरद पवार-अजितदादांबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा दावा; सर्वच बुचकळ्यात!

Split in NCP : शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यात भेट झाली. यानंतर दोन्ह नेत्यांमध्ये मनोमिलन झाले अशी चर्चा सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मोठा दावा केला आहे...
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची, कोणते आमदार कोणत्या गटाचे? असा प्रश्न राज्यभरात विचारला जात आहे. परंतु राष्ट्रवादीतील मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराने केलेल्या वक्तव्याने सर्वच बुचकळ्यात पडले आहेत.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकच असल्याचे आमदार यशवंत माने हे कार्यकर्त्यांना ठासून सांगत आहेत. अपवाद वगळता या आमदारांच्या चेहऱ्यावर अविर्भावही तसाच दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही खरीच आहे की दिखावू? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Solapur Politics: राम सातपुतेंचे अकलूजचे दौरे वाढले; मोहिते पाटलांशी तडजोडीचे प्रयत्न ?

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने सुमारे एक महिन्यानी शनिवारी ( दिनांक ११ ) मोहोळ येथे आले होते. मधल्या काळात मराठा आरक्षण आंदोलकानी नेत्यांना गावबंदी केल्याने आमदार यशवंत माने यांनी मोहोळला येण्याचे टाळले. या वेळी त्यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आवाज उठवला आणि मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन मंत्रालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलनही केले होते.

आमदार यशवंत माने यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. परंतु त्या दिवशी माने हे आपल्या मतदारसंघात मोहोळमध्ये येऊ शकले नाहीत. शनिवारी आमदार माने मोहोळ येथे आले होते. मोहोळ शासकीय विश्रामगृहावर आमदार माने यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अजिंक्यराणा पाटील हेही आमदार माने यांचा सत्कार करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आले होते. नेमके त्याच वेळी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार माने यांचा जंगी सत्कार केला.

सोलापूर शहर राष्ट्रवादीचा सत्कार स्वीकारल्यानंतर यशवंत माने यांनी सर्वांचे आभार मानले. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार समर्थक ) यांचा सत्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे, अशी टिप्पणीही माने यांनी केली.

यावर लगेचच त्या ठिकाणी उपस्थित असलेले अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पण अजित पवार गट असे म्हणा. यावर माने यांनी प्रत्युत्तर देत आणि शब्दांवर जोर देऊन 'अहं, गट नाही राष्ट्रवादीच,' असे ठासून म्हणाले.

आमदार यशवंत माने यांच्या बोलण्यातून पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट नाहीत, तर पक्ष एकच आहे, असा अर्थ ध्वनित झाला. या वेळी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

आमदार यशवंत माने यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार गट एकच असल्याचं भविष्यात समोर येईल, असे उघड झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चाही सुरू झाली.

Ajit Pawar, Sharad Pawar
Kolhapur Politics : मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांना चिमटा, ‘पाणी योजनेचे श्रेय कोणा एकाचे नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com