Kolhapur News: राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचा आमदार ते राष्ट्रवादीच्या खासदारापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याने राष्ट्रवादीला भरघोस प्रतिसाद दिला. ज्या ज्या वेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा व्हायची, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला जायच्या. त्यावेळी कोल्हापूरच्या राष्ट्रवादीला एक वेगळा विचार आणि बळ मिळाले होते. ते म्हणजे शरद पवार आणि स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक, पण 2007 च्या आसपास मंडलिक यांनी राष्ट्रवादी सोडली अन् शरद पवार यांना आव्हान दिले.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करून पुन्हा एकदा मंडलिक यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पवार यांच्या एका वाक्याने हार मानावी लागली होती. त्याचा फटका हातकणंगले लोकसभा मतदारसंघालाही बसला होता.
1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या रूपाने दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार मिळाला. मात्र,
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काडीमोड झाली आणि स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.
सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी आपापल्या परीने राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता. मात्र, स्थानिक राजकारण आणि बेरजेच्या राजकारणाचा विचार करत काँग्रेसच्या नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यातून 2009 च्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित झाली.
2009 ला संभाजीराजेंना लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली, पण या निवडणुकीत संभाजीराजेंचा पराभव झाला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून विजय देवणे, तर सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी संभाजीराजे राजकारणात नवखे होते. खरंतर या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी खासदार धनंजय महाडिक इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी संभाजीराजेंना उमेदवारी दिली. त्यामुळे धनंजय महाडिक हे जरी संभाजीराजेंच्या व्यासपीठावर उपस्थित असले तरी त्यांची सर्व यंत्रणा सदाशिवराव मंडलिक यांच्या मागे होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीराजे छत्रपती यांच्या विजयासाठी आणि लोकनेते मंडलिक यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी या मतदारसंघात तब्बल सहा सभा घेतल्या होत्या. यातील एका सभेने लोकसभेचं वारं फिरवलं. शरद पवार यांनी सदाशिवराव मंडलिक यांचा 'म्हातारा बैल' असा उल्लेख केल्याने कोल्हापूरकरांच्या लोकभावना अधिक तीव्र झाल्या.
स्वाभाविकच कोल्हापूरकरांनी लोकनेते मंडलिक यांच्या बाजूने कौल दिला. शरद पवार यांचं एक विधान सदाशिवराव मंडलिक यांच्या पथ्यावर पडलं. 'म्हातारा बैल' असं विधान शरद पवार यांनी केलं आणि ते मात्र कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागलं. याचा उलट परिणाम झाला आणि मतदान शरद पवारांच्या विरोधात गेलं. छत्रपती घराण्याचा मानही प्रचार काळात राखला गेला, पण जनमत बदललं होतं.
शरद पवार यांच्या या वक्तव्याचा फटका त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ही बसला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नवा चेहरा मैदानात उतरल्याने लोकांनी राजू शेट्टी यांना पसंत दिली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवेदिता माने यांचादेखील पराभव झाला. R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.