Sharad Pawar News : अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचे पवारांनी वाढवले टेन्शन; मला सोडून गेलेले पाच-सहाच...

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याची भूमिका घेतली.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही रविवारी (ता.२) फुट पडली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी समर्थकांसह महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याची भूमिका घेतली.

शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात आज. शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Sharad Pawar News
Sharad Pawar On Praful Patel: प्रफुल्लभाई भाग्यवान, नुसता फॉर्म भरला की संसदेचे सदस्य होतात; शरद पवारांचा पटेलांना चिमटा

या वेळी पवार म्हणाले, मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. अशा गोष्टी घडल्यानंतर अंतिम रिझल्टर जनता देते. भले तो आज नसेल सहा महिन्यांनी लागला. मात्र, वर्षभराने लागला तर तो रिझल्ट या देशातला सर्वसामान्य मतदारच देतो. माझा विश्वास कार्यकर्ते आणि सामान्य माणसावर आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. कारवाई किंवा इतर कुठला विषय आहे. त्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील असेही पवार यांनी म्हटले.

पक्षाचे भवितव्याबाबत हा प्रकार मला नवीन नाही आहे. १९८० मध्ये ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यातील सहा सोडता सर्व जण आम्हाला सोडून निघून गेले. निवडणुकीनंतर मी ५८ चा नेतो. मात्र, पक्षफुटीनंतर मी पाचच लोकांचा नेता राहिला होतो. त्या पाच लोकांना बरोबर घेऊन पक्ष बांधणीसाठी महराष्ट्रात फिरलो. त्यानंतर निवडुणकीत आमची संख्या ६९ वर गेली. पक्ष सोडून गेले, त्यातील ३ ते ४ वगळता सर्व निवडणुकीत पडले होते, हे उदारहन सांगत पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना इशारा दिला.

Sharad Pawar News
Ajit Pawar News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पक्ष पदाधिकार्यांचा कल अजितदादांकडेच

पवार म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांना भूमिका घेण्याचा आधिकार आहे, त्यात काही चुकीचे नाही. बाकीचे आम्ही सगळे लोक, आमचे अनेक खासदार, आमदार हे कष्टाने निवडून येतात. लोकांमध्ये काम करतात, मेहनत करतात. आमचे एक सहकारी प्रफुल्लभाई हे भाग्यवान आहेत. नुसता फार्म भरला की ते संसदेचे सभासद होतात. या आमच्या लोकांना मत द्यायचीसुद्धा वेळ येत नाही. कारण आम्ही त्यांना बिनविरोध निवडून देतो, असा टोला पवार यांनी पटेलांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com