Sharad Pawar On Praful Patel: प्रफुल्लभाई भाग्यवान, नुसता फॉर्म भरला की संसदेचे सदस्य होतात; शरद पवारांचा पटेलांना चिमटा

Rashtrawadi Crisis: एरवी कायम सावलीसारखे वावरणारे पटेल हे अजितदादांसोबत गेल्याने पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Sharad Pawar-Praful Patel
Sharad Pawar-Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : आमचे एक सहकारी प्रफुल्लभाई हे भाग्यवान आहेत, नुसता फार्म भरला की ते संसदेचे सभासद होतात. या आमच्या लोकांना (आमदार-खासदार) मत द्यायचीसुद्धा वेळ येत नाही. कारण, आम्ही त्यांना बिनविरोध निवडून देतो. कसल्याही प्रकारचा निवडणुकीत जो खर्च असतो, तो त्यांना येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना चिमटा काढला. (Prafullbhai Is Lucky, just fills form and becomes a member of parliament: Sharad Pawar)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडात खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) हेही त्यांच्यासोबत आहेत. एरवी कायम सावलीसारखे वावरणारे पटेल हे अजितदादांसोबत गेल्याने पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत तशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली. त्यासंदर्भाने शरद पवार (Sharad Pawar) आज कराडमध्ये बोलत होते.

Sharad Pawar-Praful Patel
Bihar Politic's : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार?; नीतीशकुमारांचे आमदार एनडीएच्या गळा लागल्याचा दावा

पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांना भूमिका घेण्याचा आधिकार आहे, त्यात काही चुकीचे नाही. बाकीचे आम्ही सगळे लोक, आमचे अनेक खासदार, आमदार हे अतिशय कष्टाने निवडून येतात. लोकांमध्ये काम करतात, मेहनत करतात. आमचे एक सहकारी प्रफुल्लभाई हे भाग्यवान आहेत. नुसता फार्म भरला की ते संसदेचे सभासद होतात. या आमच्या लोकांना मत द्यायचीसुद्धा वेळ येत नाही. कारण आम्ही त्यांना बिनविरोध निवडून देतो.

कसल्या प्रकारचाही निवडणुकीत जो खर्च असतो, तो प्रफुल्ल पटेल यांना येत नाही. त्यामुळे अगदी सहजपणाने त्यांना संसदेत जाण्याची संधी मिळते. ते भाग्यवान आहेत, त्यामुळे ते यासंबंधीचं मार्गदर्शन करत असतील तर आम्ही ऐकून सोडून देऊ, असा टोलाही त्यांनी पटेलेंना लगावला.

Sharad Pawar-Praful Patel
Praful Patel News : शरद पवारांना फोन करणार...पण आता आम्ही मागे फिरणार नाही; प्रफुल्ल पटेलांनी केली भूमिका स्पष्ट

दरम्यान, भाजपसोबत जाण्यासाठी आम्ही शरद पवार यांचे मन वळवत होतो. पण पवार तयार नव्हते, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सकाळी सांगितले की, त्यावर पवार यांनी ‘ही चांगली गोष्ट आहे. ही काय वाईट गोष्ट आहे का.’ असा सवाल पत्रकारांना केला. तसेच, सुनील तटकरे यांना सरचिटणीस असल्याचे पत्र अजित पवार यांनीही दिले असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याबाबत जयंतराव पाटील यांनी काही ॲक्शन घेतलेली आहे, त्याबाबत मला काही माहिती नाही, असे उत्तर पवार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com