Sharad Pawar : '' आम्ही वाई, फलटणला उमेदवार देणार आणि...'' ; शरद पवारांचं विधान!

NCP News : ''साताऱ्यातील सभेत पावसात भिजलो, त्यानंतर लोकं...'' असंही पवारांनी माध्यमांसमोर बोलून दाखवलं.
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : ''सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत आम्ही फलटण आणि वाई मतदारसंघात उमेदवार देणार आणि निवडून आणणारचं.'' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ आणि वाई तसेच फलटण विधानसभा निवडणुकीबाबतचा प्रश्न उपस्थित केल्यावर शरद पवार यांनी ''साताऱ्यातील सभेत पावसात भिजलो, त्यानंतर लोकं काय करतात ते सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात व विधानसभा निवडणुकीत वाई व फलटणमध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणणार.'', असे त्यांनी ठामपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News :
Assembly Elections Results : ''देशात पुन्हा मोदी लाट, आता 2024 ला '350 प्लस'' ; खासदार विखेंनी व्यक्त केला विश्वास!

याशिवाय मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यावेळी आम्ही, ''एकाच्या ताटातलं काढून घेऊ दुसऱ्याला देऊ नये, ही भूमिका घेतली होती. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय सर्व काही स्पष्ट होणार नाही.'' असे सांगितले. तसेच, केंद्र शासनानेही याबाबत निर्णय घेण्याचा ठराव घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.

अजित पवारांवर अधिक बोलणे टाळले -

शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये महायुतीत लोकसभा मतदारसंघ जागा वाटपावर चर्चा झाली असून आघाडीची भूमिका कुठपर्यंत आली आहे, या प्रश्नावर पवार यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र बसून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे स्पष्ट केले.

Sharad Pawar News :
Telangana Election Result 2023 : ''...म्हणून तेलंगणाने 'BRS'ला नाकारलं अन् काँग्रेसला निवडलं '' ; अशोक चव्हाणांचं विधान!

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, यावर शरद पवार यांनी त्यांची भाजपशी जवळीक आहे. त्यामुळे ते त्या पक्षाला साजेसेच बोलणार ना? असे सांगत अधिक बोलणे टाळले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com