Assembly Elections Results : ''देशात पुन्हा मोदी लाट, आता 2024 ला '350 प्लस'' ; खासदार विखेंनी व्यक्त केला विश्वास!

MP Sujay Vikhe : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या विजयाचा महायुतीने केला जल्लोष
Sujay Vikhe News
Sujay Vikhe NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : देशातील चार राज्यातील मतमोजणी आज पार पडली. भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. दुपारीच भाजपला मिळालेल्या निर्णायक आघाडीचे विजयोत्सव नगरमध्ये भाजप महायुतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरा केला.

यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकसभा 2024 मधील निवडणुकीत एनडीए महायुतीचे '350 प्लस' खासदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe News
Bhingar Cantonment: 'कॅन्टोन्मेंट'कडील भिंगारचा पालिकेत समावेश; खासदार, आमदारांच्या बैठकीनंतर भिंगारमध्ये वेगळेच सूर

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूक झाली. यापैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसचा पराभव करत यंदा काॅंग्रेसने पुनरागमन केलं आहे. तर मिझोरम राज्याची मतमोजणी उद्या होणार आहे.

आज मतमोजणी झालेल्या चार राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाचा जल्लोष संपूर्ण देशात केला जात आहे. नगरमध्ये देखील भाजप महायुतीकडून जल्लोष साजरा केला गेला. भाजपचे खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके आणि पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला.

Sujay Vikhe News
Assembly Election 2023 : ‘ही तर २०२४ च्या महाविजयाची नांदी आहे’

खासदार सुजय विखे म्हणाले, "या निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी देशात एकत्र आली आहे. या निकालातून पुन्हा एकदा पंतप्रधानांना जनतेने पाठिंबा दिला आहे. पंतप्रधानांवर जेवढे आरोप केले. त्याला जनतेनेे निकालातून उत्तर दिले आहे.

तसेच, ''हा निकाल 2024 ला पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट सांगत आहे. लोकसभेत 2019 मध्ये ही सर्व राज्य भाजपकडून निघून गेली होती. तरी देखील देशात 302 खासदार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2013 मध्ये जशी लाट आली होती, त्याचा परिणाम आपण सर्वांना अनुभवला. आता 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असून देशात एनडीएचे 350 प्लस खासदार निवडून येतील, हे अधोरेखित झाले आहे". असंही सुजय विखे म्हणाले.

देशातील पाच राज्यांतील निवडणूक म्हणजे, लोकसभा 2024 ची सेमी फायनल होती, असे मानले जात आहे. देशातील चार पैकी तीन राज्यात भाजपने विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष नगरमध्ये भाजप महायुतीकडून साजरा करण्यात आला.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महायुतीने फटाके आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला. खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशावर ठेका धरला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com