जनतेचा विश्वासघात कोणी केला, याचे शरद पवारांनी आत्मचिंतन करावे

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व महाविकास आघाडीवर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - शिर्डी येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा उत्सव आज झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) या उत्सवात सहभागी झाले. त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सरकारसाठी साईबाबांकडे प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व महाविकास आघाडीवर टीका केली. ( Sharad Pawar should reflect on who betrayed the people )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्राला लोकांचे सरकार मिळाले आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अडीच वर्षांत राज्याची झालेली अधोगती, कोणताही समाज घटक खुष नव्हता. कारण हे विश्वासघाताने आलेले सरकार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पाच वर्षे जनतेने राज्याच्या विकासाची घोडदौड पाहिली आहे. म्हणून राज्यात 110 पर्यंत भाजपचे आमदार जनतेने निवडून दिले होते. तोच जनतेचा आशावाद आता पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Radhakrishna Vikhe Patil News in Marathi)

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
राधाकृष्ण विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप नेत्याचे विठ्ठलाला साकडे

ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये कोविडचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा अशी प्रार्थना साईबाबांकडे केली. तसेच राज्यातील जनतेच्या अपेक्षा राज्य सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची विनंती मी साईबाबांकडे केली असल्याचे, त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकार विषयी केलेल्या टीके संदर्भात त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली होती. 160 पेक्षाही जास्त जागा जिंकल्या होत्या. शेवटी जनतेच्या भावनेशी विश्वासघात कोणी केला याचे पवारांनी आत्मचिंतन करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

उशिरा सुचलेले शहाणपण

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने एनडीए उमेदवाराला समर्थन कोणत्याही दबावाखाली दिले नाही, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. या संदर्भात विखे पाटलांनी सांगितले की, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय होता. त्यांनी एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर नेऊन बसविण्याचा निर्णय होतो आहे. हे केवळ मोदीच करू शकतात. त्यामुळे एनडीएचे घटक नसलेल्या अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत करतो. मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण होते. त्यांनी कोणत्या दबावाखाली हा पाठिंबा दिला हे मला माहिती नाही मात्र शिवसेनेच्या बहुतांश खासदारांची भाजप बरोबर जाण्याची मागणी होती. बहुतांश खासदार अथवा लोकप्रतिनिधींच्या पुढे ऐकावे लागते. हे आता शिवसेना नेतृत्त्वाला कळू लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com